खूप कामाची आहे Flipkart ची VIP मेंबरशिप! मिळतात अनेक फायदे

फ्लिपकार्ट(Flipkart) ही ई-कॉमर्स क्षेत्रातील एक दिग्गज आणि लोकप्रिय कंपनी, जी आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या सर्व्हिस उपलब्ध करून देते. फ्लिपकार्टवर घरगुती वस्तूंपासून ते कपडे, गॅजेट्सपर्यंत अनेक गोष्टी ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येतात. याच्या मदतीने युजर्स घरबसल्या आपल्याला हवी असलेली वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. एवढेच काय तर फ्लिपकार्ट ग्राहकांना अनेकदा या वस्तूंवर उत्तमोत्तम ऑफर्स देखील देत असते.

फ्लिपकार्ट(Flipkart) केवळ अतिशय इंट्रेस्टिंग डिस्काउंट देत नाही तर तुम्ही त्याचे प्लस किंवा व्हीआयपी मेंबर असाल तर याच्या मदतीने तुम्ही सामान्य ग्राहकापेक्षा बरेच मोठे फायदे घेऊ शकता. फ्लिपकार्टने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी व्हीआयपी मेंबरशिप सुरू केली आहे ज्यामध्ये अनेक रोमांचक ऑफर देण्यात आल्या आहेत.

फ्लिपकार्टची ही सुविधा तुम्हाला VIP सारखा अनुभव देऊ शकते. जर तुम्हाला सेल व्यतिरिक्त डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कंपनीच्या VIP सदस्यत्वाचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरासाठी काही गृहोपयोगी वस्तू खरेदी करायच्या असतील तर हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Flipkart VIP Membership चे फायदे

  • VIP मेंबरशिप घेतलेल्या अनेक युजर्सना त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी ऑफर केली जाते
  • VIP मेंबरशिपद्वारे, तुम्ही खरेदीवर 5 टक्के सुपर कॉइन्स गोळा करू शकता
  • VIP मेंबरशिपमध्ये तुम्हाला 5% अतिरिक्त बचतीची ऑफर दिली जाते
  • VIP मेंबरशिपमध्ये तुम्हाला कोणत्याही विक्रीसाठी लवकर प्रवेश दिला जातो
  • फ्लिपकार्टच्या या सुविधेत तुम्हाला 48 तासांच्या आत पिकअपची सुविधा दिली जाते

अशाप्रकारे मिळवू शकता Flipkart VIP Membership

  • तुम्हाला फ्लिपकार्ट व्हीआयपी मेंबरशिप घ्यायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फ्लिपकार्ट ॲपवर जावे लागेल
  • आता तुम्हाला होम पेजच्या तळाशी दिसणाऱ्या अकाउंट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
  • अकाउंट पर्यायावर टॅप केल्यानंतर, तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला तुमच्या नावाच्या खाली दिसणाऱ्या मेंबरशिप पर्यायावर टॅप करावे लागेल
  • आता तुम्हाला नवीन पेजवर Flipkart VIP चा पर्याय मिळेल
  • तुम्ही Flipkart VIP वर टॅप करून त्याचे फायदे तपासू शकता
  • तुम्हाला ते खरेदी करण्याचा पर्याय पेजच्या बॉटम साइटला मिळेल

हेही वाचा :

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान…! मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंतीचा सोहळा

2040 पर्यंत मृतांचा आकडा 80 लाखांवर, भारतावर मोठं संकट

BCCI समोर पाकिस्तान नतमस्तक, ICC कडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलला मंजूरी