हिंगोली: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण(reservation)मिळावे आणि सगे सोयरे कायदा अंमलात आणावा, यासाठी शनिवारी (दि.६) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत भव्य मराठा आरक्षण संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुपारी १ वाजता मनोज जरांगे यांचे बळसोंड भागात आगमन झाल्यानंतर त्यांचे शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
रॅलीची सुरुवात झाल्यानंतर दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचे आगमन झाले. यावेळी मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यांस अभिवादन व पूजन केले. शहरातून हजारो मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत रॅलीने संपूर्ण शहर गजबजून गेले.
रॅलीच्या समोर टाळ-मृदंगाच्या जयघोषात वारकरी सहभागी झाले होते. वारकर्यांच्या मागे रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता, तर रथाच्या मागे जरांगे यांची गाडी होती. त्यांनी उपस्थित समाज बांधवांचे अभिवादन स्वीकारले. दुपारी ४ वाजता संवाद रॅली इंदिरा गांधी चौकात आल्यानंतर ती सभेत रूपांतरित झाली.
सभेला जवळपास दीड लाख मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेरणादायी भाषणाने हिंगोलीत मराठा आरक्षण आंदोलनाला नवसंजीवनी मिळाली.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्ध भारताची युवा ब्रिगेड विजयी, मालिकेत २-० आघाडी
मनोज जरांगे पाटील यांचे सरकारवर हल्लाबोल, समाजाला एकजुटीचे आवाहन
अजित पवार समर्थकाने फिरवले वार, शरद पवार गटाच्या खासदाराला दिला विजय