सुखी वैवाहिक आयुष्यासाठी पार्टनरला ‘या’ 3 गोष्टी कधीच सांगू नका!

नाते संबंध टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो(relationship), पण काही गोष्टी अशा असतात ज्या सांगण्यापेक्षा लपवलेल्याच चांगल्या! जर या गोष्टी उघड झाल्या तर नात्यात दुरावा येऊ शकतो. कोणत्या गोष्टी पार्टनरपासून लपवाव्यात हे जाणून घ्या.

भूतकाळातील प्रेमसंबंध
लग्न झाल्यानंतर कोणत्याही जोडीदाराला आपल्या जोडीदाराचा भूतकाळ जाणून घ्यायचा नसतो. जुन्या प्रेमसंबंधांबद्दल बोलल्यास अनेकदा गैरसमज निर्माण होतात आणि यामुळे नात्यात कटुता येते.जर भूतकाळातील कोणत्याही नात्याची चर्चा केली तर सध्याच्या नात्यात अविश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जुन्या नातेसंबंधांविषयी माहिती द्यायची की नाही याचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

वाईट अनुभव शेअर करू नयेत
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वाईट अनुभव येतात, (relationship)पण त्याबद्दल प्रत्येकवेळी बोलणे योग्य ठरत नाही. आपल्या जोडीदारासोबत फक्त सकारात्मक चर्चा करावी आणि भविष्यासाठीच्या योजना सांगाव्यात.

जर तुम्ही वारंवार तुमच्या भूतकाळातील वाईट अनुभव शेअर करत असाल, तर तुमचा जोडीदार त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतो किंवा त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकतो. त्यामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. म्हणूनच भूतकाळातील नकारात्मक गोष्टी सांगणे टाळा.

घरगुती वाद-प्रतिवाद पार्टनरपर्यंत पोहोचू देऊ नका
कधी कधी आपल्या घरातील लोक आपल्या जोडीदाराविषयी (relationship)नकारात्मक बोलतात. अशा गोष्टी आपल्या पार्टनरला सांगण्याची गरज नसते. जर तुम्ही हे सांगितले, तर तुमचा जोडीदार नाराज होईल आणि तुमच्या कुटुंबासोबत त्याचे नाते दुरावेल. त्यामुळे घरातील नकारात्मक चर्चा आपल्या जोडीदारापर्यंत नेण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. हे केल्यास तुमचे वैवाहिक जीवन अधिक शांत आणि आनंदी राहील.

हेही वाचा :

तरुणाची निर्घृण हत्या; शरीराचे तुकडे वेगवेगळ्या विहिरीत सापडले

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!

सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’ची पहिली झलक; ‘एका बुक्कीत टेंगुळ’ डायलॉगने घातला धुमाकूळ!