उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडून आली आहे. भाजी (vegetables)चोरली म्हणून इथे एका व्यक्तीला चक्क भररस्त्यात मारहाण करण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे प्रकरण नंतर थेट पोलीस ठाण्यात पोहचले असून यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. नक्की प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ(vegetables) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचे भररस्त्यात हातपाय बांधून त्याला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. तसेच या व्हिडिओत, मारहाण करण्यात आलेली व्यक्ती पुन्हा तेथून निघून जाण्याची विनंती करत असल्याचेही दिसून येत आहे. मात्र यावेळी त्याचे कोणीही ऐकत नाही आणि लोकांची भरगोस गर्दी हा सर्व तमाशा पाहत बसलेली असते.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीवर ‘झुकिनी’ (भाजी) चोरल्याचा आरोप होता. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ही घटना बहेरी भागातील सक्रस गावात घडल्याचे सांगण्यात येत आहे. जलालुद्दीन नावाच्या व्यक्तीने चंद्रपालच्या शेतात उगवलेली झुकिनी तोडली. त्याच वेळी चंद्रपालने त्याला झुकिनी तोडताना पाहिले आणि याबद्दल सगळीकडे गोंगाट केला.
चंद्रपाल आणि त्याचा मित्र इंद्रपाल यांच्यासह अनेकांनी त्याचा पाठलाग करून त्याला मारहाण केली. दोघांमध्ये वाद झाला आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनीही जलालुद्दीनला मारहाण करण्यास सुरुवात केली. इंद्रपालसह अनेकांनी त्याचे हात-पाय बांधले, त्याला जमिनीवर झोपवले आणि मारहाण केली.
त्याचवेळी डझनभर लोक हे सर्व पाहत उभे राहिले आणि व्हिडिओ बनवत राहिले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. याप्रकरणी बहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इंदरपालने जलालुद्दीनविरुद्ध झुची चोरीचा गुन्हा दाखल केला आहे, तर जलालुद्दीनने इंदरपालवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
अवघ्या 11 दिवसांत पालटणार ‘या’ राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तोच देश, तोच स्विमिंग पूल अन् तोच बॅकग्राऊंड; हार्दिक पांड्याने लपवलेलं अफेअर अखेर उघड?
तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी…