… त्या गोष्टीसाठी भाजप शिंदे व अजित पवारांचा पक्ष फोडेल!

विधानसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या(politics) घडामोडींचा मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “भाजपकडे बहुमत आहे आणि जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर ते बहुमत कसं मिळवायचं? तसेच कोणाला तोडायचं आणि कोणाला खरेदी करायचं ? यामध्ये ते माहिर असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, बहुमतासाठी भाजप पक्ष(politics) हा एकनाथ शिंदे यांची पार्टी सुद्धा तोडू शकतो आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी देखील तोडू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री हा भाजप पक्षाचाच व्हायला पाहिजे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील असेही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच 2019 साली अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युला आम्ही सांगत होतो, तेव्हा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मात्र मान्य नव्हता. तसेच त्यांनी तेव्हा अडीच वर्ष फॉर्मुला मान्य केला असता तेव्हा पुढल्या अनेक घडामोडी देखील टाळता आल्या असत्या.

परंतु फक्त शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्यांना त्रास द्यायचा होता. तसेच त्यांना शिवसेना हा पक्ष फोडायचा होता म्हणून त्यांनी तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्मुला पाळला नाही आणि आता ते सर्व काही करायला देखील तयार आहेत. मात्र, यातून लक्षात घ्या की महाराष्ट्र विषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा :

हिंदुंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या चिन्मय दास यांना अटक

धक्कादायक… घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं

अजित पवारांनी टायमिंग साधलं, देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवलं, राजभवनात काय घडलं?, VIDEO