जुनी दोस्ती विसरून अभिजितनं झाडली दयावर गोळी, CID मालिकेचा नवा प्रोमो समोर

छोट्या पडद्यावर तब्बल 20 वर्षांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणारी CID ही मालिका(promo) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत यांचा थरारक तपास, सांळुंखेच्या मजेदार कोट्या आणि शेवटी गुन्ह्याचा होणारा उलगडा यात प्रेक्षकांचे मनोरंजन ठरलेले.

CID च्या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्यानंतर आता सोनी टीव्हीने CID चा नवा प्रोमो त्यांच्या इंस्टाग्रॅम पेजवरून शेअर केला आहे. या प्रोमोमुळे(promo) आपली जुनी दोस्ती विसरत अभिजितनं दयावर गोळी झाडल्याचं दिसतंय. या प्रोमोनं प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा एकदा या मालिकेकडे खिळल्या आहेत.

सोनी टीव्हीने त्यांच्या Instagram पेजवरून भरपूर ट्विस्ट असलेला आणि प्रेक्षकांना चकित करणारा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत दयाशी वर्षानुवर्ष केलेली सोबत, काम आणि जुनी दोस्ती विसरून अभिजित दयावर गोळी झाडताना दिसतोय. गोळी छातीत बसल्यावर दया दरीत पडतो आणि एसीपी प्रद्युम्नची एन्ट्री होते.

सोनीच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोत तुफान पाऊस सुरु असतो. वादळी पावसानं अंधारलेलं असतं. इतकी वर्ष एकत्र लढलो असं म्हणत अभिजित दयावर बंदुक ताणतो. तो ही ‘चलाओ गोली अभिजित..’ असं अभिजितला ओरडून सांगतो. यावेळी मागून एसीपी प्रद्युम्नही ओरडतात.

अभिजित 2 गोळ्या दयावर झाडतो. तसा दया दरीत कोसळतो. यामागे काय रहस्य आहे हे उलगडण्यासाठी CID लवकरच येतंय अशा आशयाचा प्रोमो इंस्टाग्रॅमवर पोस्ट करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासूनची मैत्री विसरत, अभिजितने दयावर गोळी का झाडली? असं कॅप्शन या प्रोमोवर देण्यात आलं आहे.

या प्रोमोवर(promo) नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटस केल्या आहेत. आता कटप्पाने बाहुबलीला का मारलं नव्ळे तर अभिजितनं दयाला का मारलं असं म्हणावं लागेल असं एका नेटकऱ्यानं लिहिलं. अनेकांनी अखेर बालपण परत आलं.. असंही लिहिलंय. प्रेक्षकांनी CID च्या या प्रोमोला भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसतंय.

हेही वाचा :

खासदार महाडिकांनी एकाचवेळी शिराळा आणि कोल्हापूर उत्तरसाठी डाव टाकला, पण हुकला

महाविकास आघाडीत पेच निर्माण; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता बंडखाेरीच्या तयारीत

दिवाळीनंतर अंधार होईल इतकी राज्याची तिजोरी साफ केलीय; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका