कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे माजी आमदार(MLA) प्रकाश आवाडे जुनी वसुली करण्यासाठी अत्यंत आक्रमक झाल्याचे दिसून आले. हुपरी रोडवरील अभिषेक मिल्समध्ये जुनी वसुली वसूल करण्यासाठी प्रकाश आवाडे थेट अभिषेक मिलच्या प्रवेशद्वाराचे गेटला असणारे कुलूप तोडून आत शिरले.
कंपनीकडून जुनी देणी व्याजासह वसुली करण्यासाठी प्रकाश आवाडे आक्रमक झाले आहेत. या कंपनीच्या गेटवर आल्यानंतर आवाडे यांच्या सहकाऱ्यांकडून उपस्थित कर्मचाऱ्यांना गेट उघडण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्हीच गेटच्या बाहेर आहोत, गेटचं कुलूप आतून लावण्यात आलं आहे. आम्ही कामगार आहे, आम्ही काही करु शकत नाही, त्यामुळे आत आवलेल कुलूप उघडू शकत नाही असे सांगितले.
यावेळी आक्रमक झालेल्या माजी आमदार(MLA) प्रकाश आवाडे यांनी सहकाऱ्यांना कुलूप तोडण्याचा आदेश देत आत प्रवेश केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अभिषेक मिल्कमध्ये प्रकाश आवाडे भागीदार आहेत.
मात्र, न्यायालयीन प्रक्रिया आणि कोरोना आल्यामुळे प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. त्यामुळे केलेली गुंतवणूक परत व्याजासह मिळावी या मागणीसाठी माजी आमदार प्रकाश आवाडे आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रयत्न करूनही पैसे परत नसल्याने आवाडे याांनी आक्रमक होत अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून शिरले. दरम्यान, याबाबत प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन उचललेला नाही.
हेही वाचा :
रस्त्यावर वेगमर्यादा पाळा, अन्यथा खिसा होईल रिकामा!
“तोकडे कपडे घालाल तर मंदिरात प्रवेश नाही!”; सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय
यंदाची मौनी अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 29 जानेवारीपासून सुवर्णकाळ सुरू