उद्यापासून इचलकरंजीसह २१ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत अनेक नवनवीन उपक्रम(eyes) राबविले जातात. इचलकरंजी येथील बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे इचलकरंजीसह परिसरातील पाच गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजीत केले आहे. २ जूनपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून २१ ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहे. सांगलीच्या श्री टेके आय केअर हॉस्पिटलच्या मदतीने शिबिर होत आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.(eyes) शहरात विविध १६, तर ग्रामीण ५ भागात हे शिबिर होणार आहे.

सर्वप्रथम २ जूनला महादेव मंदिर गावभाग व आदर्श विद्यामंदिर मुक्त सैनिक सोसायटी येथे शिबिर होणार आहे. शिबिरातून पडद्याच्या सर्व शस्त्रक्रिया, पापणीच्या आजारावरील शस्त्रक्रिया, (eyes)तिरळेपणावर उपचार यांसारख्या विविध उपचारांची सोय केली जाणार आहे. उपक्रमात किमान १ हजार नागरिकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया व किमान सहा ते सात हजार नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी होईल, असे कारंडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

इचलकरंजी महापालिकेची अतिक्रमण मोहीम दुसऱ्या दिवशीही सक्रिय; हातगाडे, फलक जप्त

सांगलीत चंद्रहार पाटील एकाकी? मतमोजणीसाठी उमेदवार प्रतिनिधीच नाही

T20 WC:उद्यापासून सुरू होतोय टी-२० वर्ल्डकप