७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने(govt)मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व उत्पन्न गटांतील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘आयुष्मान भारत’ योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे उच्च व मध्यमवर्गीयांसह सुमारे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार, सुमारे ४.५ कोटी कुटुंबांना याचा थेट लाभ होईल. यासाठी सरकारने ३,४३७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक वैद्यकीय सुरक्षा मिळणार आहे, आणि या योजनेत सहभागी असलेल्या ज्येष्ठांना त्यांच्या विद्यमान वैद्यकीय विम्यासह अतिरिक्त संरक्षण मिळणार आहे.
यासोबतच, जलविद्युत निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी ‘पीएम ई-ड्राइव्ह’ या योजनेलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे देशातील ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळवण्याची संधी मिळणार असून, ही योजना त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरणार आहे.
हेही वाचा:
खोतवाडी-तारदाळ रस्त्याचे निकृष्ट काम: ग्रामस्थांची नाराजी, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर वचक कोण ठेवणार?
सेलिब्रिटींकडे फारसे लक्ष न द्या; करीना कपूर खानचं स्पष्ट मत
“प्रेम त्रिकोणात अडथळा ठरलेला पोलीस सब इन्स्पेक्टर; लेडी कॉन्स्टेबलने अशा प्रकारे सोडवला पेच!”