कोल्हापूर :विशाळगडावर नेऊन मित्राचा चिरला गळा अन् दरीत फेकला मृतदेह

मित्राला पार्टीच्या बहाण्याने विशाळगडावर नेऊन त्याचा (pretext)खून करणाऱ्या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी दोषी ठरवले. आरोपींपैकी संजय शरद शेडगे याचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. उर्वरित अमीर ऊर्फ कांचा अब्बास मुल्ला वय २७, सुनील बाळू खोत ३८, सिद्धराम ऊर्फ सिद्धार्थ शांताप्पा म्हेतर ३०, सर्व रा. लिंबू चौक, इचलकरंजी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या चौघांनी संतोष मोहन तडाके ३०, रा. इचलकरंजी याचा खून करून मृतदेह विशाळगडजवळ कोकण दर्शन पॉईंटवरून दरीत फेकून दिला होता. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तडाके व आरोपी संजय शेडगे दोघे मावसभाऊ होते. संतोष आपल्याला वरचढ होत असल्याची भावना संजयच्या मनात होती. यातून संजयने तिघा मित्रांच्या मदतीने संतोष तडाकेचा खून करण्याचा कट रचला. चौघांनी २१ सप्टेंबर २०१९ ला विशाळगड येथे पार्टी करण्याच्या बहाण्याने संतोषला बोलावून घेतले.

आरोपी अमीर मुल्ला, सुनील खोत, सिद्धराम म्हेतर(pretext) यांच्यासोबत पाच जण चारचाकीतून विशाळगडला रवाना झाले. सर्वांनी वाटेत मद्यपान केले. आंबा-मानोलीमार्गे सर्वजण कोकणदर्शन पॉईंटला आले. संतोष तडाके बेसावध असताना चौघांनी त्याच्यावर हल्ला केला. कोकण दर्शन पॉईंटजवळच त्याचा गळा चिरून त्याचा मृतदेह दरीत फेकला. तसेच हत्यारेही मृतदेहासोबत फेकून सर्वजण पुन्हा इचलकरंजीकडे आले. त्यांनी वाटेत शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीत रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे फेकले होते. यानंतर चौघेही इचलकरंजीला निघून गेले.

मुख्य संशयिताचा मृत्यू
खुनाचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे ॲड. मंजू पाटील यांनी १७ साक्षीदार तपासले. दरम्यान, मुख्य आरोपी संजय शेडगे याचा मृत्यू झाल्याने इतर तिघांविरोधात खटला सुरू होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही ॲड. पाटील यांनी घेतलेल्या साक्षी, तसेच त्यांनी केलेला युक्तिवाद आणि उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने (pretext)तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तपास अधिकारी भालचंद्र देशमुख, पैरवी अधिकारी सीमा अष्टेकर यांचे सरकारी पक्षाला सहकार्य केले.

टुरिस्ट गाईडमुळे खुनाचा सुगावा
मानोली भागात टुरिस्ट गाईड म्हणून काम करणारे दिनेश कांबळे यांना कोकण दर्शन पॉईंटजवळील फरशीवर रक्त सांडलेले दिसले होते. त्यांनी याची माहिती पोलिसपाटील दत्तात्रय गोमाडे रा. मानोली, शाहूवाडी यांना दिली. याबाबत गोमाडे यांनी दिलेल्या माहिती आधारे शोध घेतला असता दरीत संतोष तडाकेचा मृतदेह मिळाला. याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चौघांना अटक केली होती.

हेही वाचा :

मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू

प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral

‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हा