‘…तर शिवराज्याभिषेकाच्या दिवशीच सचिन तेंडुलकरचा त्याच्या घरासमोर पुतळा जाळणार!’; बच्चू कडूंनी दिली वॉर्निंग

सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाइन(house) रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवाय सचिनने भारत सरकारने दिलेला भारतरत्न पुरस्कार परत करावा अशी मागणीदेखील बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, “रमीच्या व्यसनातून आत्महत्या(house) अतिशय खेदजनक आणि संताप आणणारी गोष्ट आहे. जो अंगरक्षक सचिन तेंडुलकरचा जीव वाचण्यासाठी काम करतो त्या अंगरक्षकावर सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळे आत्महत्या करायची वेळ आली असेल, तर ही जबाबदारी सचिन तेंडुलकरने स्वीकारली पाहिजे.”

ज्या सचिन तेंडुलकरला आम्ही भारतरत्न म्हणून स्वीकारलं त्यांच्या ऑनलाइन रमीच्या जाहिरातीमुळेच त्यांचा अंगरक्षक आत्महत्या करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे सचिन तेंडुलकरने ऑनलाइन रमीची ती जाहिरात सोडली पाहिजे नाहीतर भारतरत्न पुरस्कार परत केला पाहिजे. अन्यथा सहा जूनला शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशीच त्याच्या घरासमोर त्याचा पुतळा जाळून आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

तर यावेळी बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. ते म्हणाले ही लोकसभा निवडणूक धर्मयुद्ध म्हणून समोर येत आहे, जातीपातीच्या राजकारणाला मोठे उत्तेजन मिळाले आहे. या निवडणुकीत जातीचे व धर्माचे गणित मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि भाजपकडून झाला. ही निवडणूक मूळ मुद्यांपासून फार दूर गेली आहे.

मुंबईमध्ये रोज सहा लाख लोक फूटपाथवर झोपतात, आणि दुसरीकडे सहा हजार एकर जमीन 6 कुटुंबांजवळ आहे, हा ही मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान यायला पाहिजे होता, पण तो आला नाही. या संदर्भात आम्ही जून महिन्यात गोदरेजच्या मैदानात जी 3000 एकर जमीन गोदरेज कंपनीला इंग्रजांनी दिली ती त्यांनी सरकार दरबारी जमा करावी. नाहीतर जे लोक बेघर आहेत त्यांच्या हवाली आम्ही ती जमीन करणार असल्याचं कडूंनी सांगितलं.

हेही वाचा :

इचलकरंजी तारदाळ मध्ये रेशन दुकानातील धान्यात अळ्या; ग्राहकातून संताप

बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

गर्भवती महिला आणि बाळांना मिळणार ६ हजार रुपये; काय आहे ही योजना?