प्रेमात असलेल्या सर्व व्यक्ती मग ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असतील किंवा अन्य(anger) पती-पत्नी असतील. या सर्वांच्या नात्यात प्रेम, आनंद, राग, द्वेश, क्रोध या सर्व गोष्टी घडतात. अनेकदा आपल्या मनात नसतानाही काही शुल्लक कारणांवरून आपण आपल्या पत्नीला ओरडतो. पत्नीला ओरडल्याने ती रुसून बसते. आता अशावेळी आपल्या पार्टनरला कसं पटवायचं याबद्दल काही खास ट्रिक्स जाणून घेऊ.
शांत रहा
जेव्हा केव्हा भाडणं होतात आणि नाती तुटतात त्याला शब्द(anger) कारणीभूत असतात. रागाच्याभरात व्यक्ती काय बोलेल आणि काय नाही याचा काही नेम नसतो. त्यामुळे भांडण सुरू असताना पत्नीला उलट बोलू नका. तिचं म्हणणं ऐकून घ्या आणि शांत राहा. शांत राहिल्याने निम्म्या अडचणी तेथेच सॉल्व होतात.
नाराज असण्यामागचं कारण शोधा
पत्नी जेव्हा आपल्या पतीवर नाराज असते तेव्हा ती काहीच बोलत नाही. आता खरं प्रेम करणाऱ्या पतीला पत्नीचा अबोला देखील सहन होत नाही. तुम्हाला देखील अशा समस्या जाणवत असतील तर पत्नी नेमकी आजारी का आहे याचं कारण शोधून घ्या.
माफी मागा
जर तुमचं प्रेम खरं असेल तर कोणत्याही प्रकारचा अॅटीट्यूड ठेवू नका. लगेचच माफी मागून घ्या. पत्नीची माफी मागितल्याने तिला देखील छान वाटते आणि ती तुम्हाला माफ करेन. माफी मागितल्याने नात्यातील दूरावा देखील संपतो.
सर्प्राइज द्या
जेव्हा पत्नी सुखी नसते किंवा तुमच्यावर रागवलेली असते तेव्हा तिला सुंदर सर्प्राइज द्या. बाहेर जेवणासाठी घेऊन जा किंवा मग आवडती वस्तू गिफ्ट म्हणून द्या. त्यामुळे पत्नी आणखी खुश होइल.
हेही वाचा :
आंब्यांच्या पेट्यांमधून दारूची तस्करी; तिघांना अटक
तीन खासदार एकत्रित येऊन करणार कोल्हापूरचा विकास…
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; १ कोटी रुपायांचा गुटखा जप्त