पॅरिस ऑलिम्पिक (Olympic)२०२४ संपल्यानंतरही कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्यपदकाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. क्रीडा लवाद न्यायालय मंगळवारी, १३ ऑगस्ट रोजी आपला निर्णय जाहीर करणार होतं, परंतु तो निर्णय आता १६ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. आता न्यायालयाचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजता जाहीर होणार आहे.
विनेशच्या बाजूने निर्णय आल्यास तिला रौप्यपदक मिळेल, ज्यामुळे संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असेल. परंतु, निर्णय तिच्या विरोधात आल्यास विनेशसह सर्व भारतीयांना निराशा होईल.
आधीच या प्रकरणाचा निर्णय १० ऑगस्ट रोजी होणार होता, परंतु वेळेत विलंब झाल्यामुळे आता निर्णयाची तारीख १६ ऑगस्ट ठरवण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) दिलेल्या निवेदनानुसार, ‘क्रीडा लवादाच्या ॲड-हॉक विभागाच्या अध्यक्षांनी विनेश फोगट विरुद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंगमध्ये निर्णय देण्यासाठी डॉ. ॲनाबेले बेनेट यांची नियुक्ती केली आहे.’
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी पॅरिसच्या वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत निर्णय देण्याचा अवधी दिला आहे.
हेही वाचा :
केस गळतीचा त्रास? रोज करा ही योगासनं आणि मिळवा निरोगी केसांची ताकद
पाण्यासाठी गेली, विनयभंगाची शिकार झाली; सार्वजनिक ठिकाणी तरुणाईची दादागिरी
काँग्रेसचा मोठा निर्णय: नाना पटोलेंच्या नेतृत्वातच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार