मतदानात गडचिरोली आघाडीवर मुंबईकर मतदानाबाबत उदासीन

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या (Financial)जाणाऱया मुंबईतील मतदार मतदानामध्ये अत्यंत उदासीन असल्याचे मागील लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरून दिसून येते. मुंबईत मागील लोकसभा निवडणुकीत सरासरी 53 टक्के मतदान झाले होते. दुसरीकडे नक्षलवादी कारवायांमुळे अत्यंत संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱया गडचिरोलीत मागील लोकसभा निवडणुकीत तब्बल 75 टक्के मतदान झाले होते.

राज्यात पाच टप्प्यांत लोकसभेचे मतदान होणार आहे. शेवटच्या पाचव्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मे महिन्यात शाळा-कॉलेजला सुट्टय़ा असतात. (Financial)सुट्टय़ांच्या काळात मुंबईकर मुंबईच्या बाहेरगावी जातात. त्यामुळे मतदानावर परिणाम होतो. मागील लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचीती आली होती. मागील लोकसभा (2019) निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबईत सर्वात कमी म्हणजे 50.3 टक्के मतदान झाले होते. दुसरीकडे नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱया गडचिरोली-गोंदियासारख्या दुर्गम व नक्षलप्रभावित भागातील मतदार नक्षलवादी कारवायांना न जुमानता मतदान करतात.

नागपूरमध्ये मतदान वाढवणार

नागपूरमध्ये नवमतदारांची संख्या वाढत आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत 75 टक्क्यांपर्यंत मतदान नेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने प्रशासन काम करीत आहे. दुसरीकडे बोगस मतदारांवरही आमचे लक्ष आहे, असे निवडणूक अधिकारी सांगतात.

नवमतदारांमध्ये जागरूकता

मुंबईत मतदानाचा हक्क बजावणाऱयांची संख्या प्रचंड कमी आहे. मात्र मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. 1999 मधील लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर मिळून सरासरी 44.85 टक्के मतदान झाले; पण 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आणि सरासरी 75.15 टक्के मतदान झाले. मुंबईतील महाविद्यालयात, खास करून नवमतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. नवमतदारांनी लोकशाहीतील अत्यंत पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा :

UPI च्या मदतीने कसे कराल पैसे जमा; इतकी सोपी आहे पद्धत

प्रेग्नेंसी काळात दीपिका पादुकोण हिची अशी पोस्ट! ‘अधिक प्रार्थना करा आणि…’

रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीजची मोफत फिल्ममेकिंग कोर्सेसची घोषणा