गणेशोत्सवाला गालबोट! मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना BMW कारने चिरडलं

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना घडत आहेत. यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आज राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण पसरले आहे. मात्र मुंबईत एक धक्कादायकघटना घडली आहे. मुलुंडमध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने आलेल्या बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर(banner) लावणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिरडल्याची घडली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुंबईमधील मुलुंडमध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने आलेल्या बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर(banner) लावणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकजणांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली झाली आहे.

यावेळी दोघांना कारने चिरडल्यानंतर कारचालकाने पळ काढला. मात्र घटनेवेळी जखमींना मदत मिळाली असती तर त्या तरुणाचे प्राण वाचू शकले असते, मात्र अपघातास कारणीभूत ठरलेला कारचालक तेथून ताबडतोब फरार झाला आहे.

या घटनेतील तरुणांचे नाव प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील आहे. तर प्रीतम थोरात या इसमाचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे मुलुंडमध्ये शोककळा पसरली आहे.

तसेच या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. तर आता पोलीस फरार कारचालकाचा कसून शोध घेण्यात येत आहे. याशिवाय जखमी तरुणावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे समजत आहे. मात्र या घटनेमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे.

हेही वाचा:

हे गणराया, त्यांना सुबुद्धी दे!

6 फुटांचा विषारी कोब्रा तोंडात पकडून स्टंटबाजी करत असतानाच…; Video

“उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम..”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट