मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राजकीय(politics) वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींची ओळख पटली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथके राज्याबाहेर पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या हत्येमागे नेमके कोण आहे, याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचे कारण आणि त्या हत्येचा मुख्य सुत्रधार कोण याचा तपास कऱण्यात पोलिसांना यश आले आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंगने बाबा सिद्धीकी(politics) यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक करनौल सिंह हा हरयाणाचा आणि दुसरा धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. 2019 साली करनैल सिंहला एका हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळीच तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आला होता. अशीही माहिती तपासात समोर आली आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी या आरोपींना आगाऊ पैसेही देण्यात आले होते. हे आरोपी गेल्या 20-25 दिवसांपासून त्यांच्यावर पाळत ठेवून होते. धक्कादायक म्हणजे एका शस्त्र विक्रेत्याने कुरियरद्वारे या आरोपींना पिस्तूल पाठवले होते. त्यामुळे घटनेनंतर काही तासातच पोलिसांच्या तपासाला वेग आला आणि या प्रकरणात अनेक बड्या लोकांचा समावेश असल्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात बाबा सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. यानंतर त्यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे माहिती आहे. त्यानंतर मुस्लिम धर्मानुसार नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना होईल आणि रात्री साडेआठच्या दरम्यान ८.३० वाजता सिद्धीकी यांचा दफनविधी होणार आहे.
हेही वाचा:
‘परदेसी गर्ल’चा नवरात्रीत ‘बहरला हा मधुमास’, डान्स पाहून चाहत्यांनी केले कौतुक
लेकीला संपवण्यासाठी आईची बॉयफ्रेण्डला सुपारी, पण तो मुलीच्याच प्रेमात पडला…
आता उलथापालथ करावीच लागेल, पर्यायच नाही; मनोज जरांगे कडाकडले
घटस्फोटानंतर हार्दिकने साजरा केला पहिला वाढदिवस! तर नताशा दिसली एल्विस यादवसोबत