अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी निवृत्तीची योजना(adani group)आखली आहे. 62 वर्षीय गौतम अदानी सेवानिवृत्तीच्या तयारीत असून, काही वर्षांत कंपनीची कमान पुढच्या पिढीकडे सोपवली जाणार आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी यांनी त्यांच्या निवृत्तीच्या नियोजनाबद्दल सांगितले. त्यांच्या योजनेनुसार ते 2030 पर्यंत कंपनीची कमान त्यांचा मुलगा आणि पुतण्यांकडे सोपवतील. गौतम अदानी यांनी वयाच्या 70व्या वर्षी निवृत्तीची योजना आखली आहे.
गौतम अदानी यांनी निवृत्ती योजना(adani group) तयार केली आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ते 2030 पर्यंत अदानी समूहाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर कंपनीची जबाबदारी त्यांची दोन मुले आणि दोन पुतण्यांवर असणार आहे.
अहवालात म्हटले आहे की जेव्हा अदानी निवृत्त होतील तेव्हा त्यांचे चार वारस – मुलगा करण अदानी आणि जीत अदानी आणि त्यांचे पुतणे प्रणव आणि सागर अदानी – कुटुंब ट्रस्टचे समान लाभार्थी असतील.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपन्यांमध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतील यासंबंधी एक गोपनीय करार केला जाईल, ज्यामध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांमधील स्टेक आणि उत्तराधिकाऱ्यांमध्ये हस्तांतरणाची संपूर्ण माहिती समाविष्ट असेल.
सध्या गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी अदानी पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक आहे, तर छोटा मुलगा जीत अदानी अदानी पोर्टचे संचालक आणि सागर अदानी अदानी समूहाचे कार्यकारी संचालक आहेत.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गौतम अदानी यांच्या निवृत्तीनंतर अदानी समूहाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही, मात्र अहवालानुसार करण अदानी आणि प्रणव अदानी हेच यासाठी प्रबळ दावेदार असतील.
हेही वाचा :
इचलकरंजी: खड्डे च खड्डे! पावसाळा संपला, पण मक्तेदार कुठे गायब?
बच्चू कडू आयत्या पिठावर नागोबा, नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो; रवि राणांनी डिवचलं
यंत्रमागधारकांच्या विज बिलात अतिरिक्त सवलतीची अंमलबजावणी न झाल्याने लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा: विनय महाजन