“गौतम गंभीरचा उत्साही नाच, आकाशदीपच्या चौकारावर हेड कोच खुश” Video

गाबा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात भारताने 9 गड्यांच्या मोबदल्यात 252 धावा केल्या. यासोबतच टीम इंडियाने फॉलोऑनही वाचवला. फॉलोऑन वाचल्याने प्रशिक्षक गौतम गंभीरसुद्धा(gautam gambhir) आनंदाने नाचायला लागला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गब्बा कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप सिंग यांनी खेळाच्या शेवटच्या सत्रात टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी शेवटच्या सत्रात दमदार फलंदाजी करत टीम इंडियाचा फॉलोऑन वाचवला. फॉलोऑन वाचल्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत(gautam gambhir) आनंदाने उडी घेतली, ज्याची प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चहापानानंतर खेळ सुरू झाला तेव्हा पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाने मोहम्मद सिराजला बाद केले होते. त्यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 8 विकेट्सवर 201 धावांवर होती. यानंतर सेटचा फलंदाज रवींद्र जडेजाही २१३ धावांवर बाद झाला. येथून बुमराह आणि आकाशदीपच्या जोडीने प्रत्येकी एक धाव घेत टीम इंडियाला २४५ धावांच्या पुढे नेले.

रवींद्र जडेजा बाद झाल्यावर फॉलोऑन वाचवण्यासाठी टीम इंडियाला 32 धावांची गरज होती. तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि नॅथन लियॉन सारखे गोलंदाज भारताच्या या शेवटच्या जोडीला बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते, पण टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंनी चांगल्या भारतीय संघाचा मान ठेवला आणि खराब चेंडूंवर चौकार ठोकून फॉलॉऑनसाठी आवश्यक 32 धावा केल्यानंतर इकडे गौतम गंभीर आणि संघाच्या खेळाडूंनी आनंद व्यक्त केला.

अशा प्रकारे, दिवसअखेर आकाशदीप सिंग 31 चेंडूत 27 धावा करून टीम इंडियासाठी नाबाद परतला तर जसप्रीत बुमराह 10 धावांसह खेळत आहे. दिवसअखेर भारताने 9 बाद 252 धावा केल्या होत्या. मात्र तरीही ऑस्ट्रेलियाकडे १९३ धावांची आघाडी आहे. अशा स्थितीत खेळाच्या शेवटच्या दिवशीची स्पर्धा रोमांचक बनली आहे. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आपल्या डावात 445 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

इचलकरंजी नगरचना विभागाचा भोंगळ कारभार

उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आनंदवार्ता… सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा, घाऊक महागाई नीचांकी पातळीवर