रेल्वेस्थानकावर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडने प्रवाशांसमोर केलं असं…लज्जास्पद Video Viral

प्रेमासमोर(love) जगाची पर्वा केली जात नाही असे म्हटले जाते. मात्र आजची पिढी या गोष्टीचे जास्तीच अनुकरण करत असल्याचे दिसून येत आहे. प्रेमात पडल्यावर वेळ-काळ नाही बघावा असेही म्हटले जाते मात्र ते व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थीची जाण ठेवणे फार गरजेचे असते.

आजकाल प्रेमाच्या व्याख्या फार बदलल्या आहेत. पूर्वीप्रमाणे तरुण आजकाल आपले प्रेम व्यक्त करताना घाबरत नाहीत, रोखठोकपणे ते आपली मतं मांडतात मात्र बऱ्याचदा नको त्या ठिकाणी आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करू लागतात, यामुळे इतर लोकांना याचा त्रास होत असतो.

आपण प्रेमात(love) आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात, भान हरपून कुठेही आपले प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत.

सध्या यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कपल भर रेल्वे स्थानकावर अश्लील चाळे करताना दिसून येत आहे. त्याच्या या लज्जास्पद कृतीचा व्हिडिओ जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर सध्या एका गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा व्हिडिओ फार चर्चेत आहे. यात रेल्वे स्थानकावरील दृश्ये दिसून येत आहेत. यात समोर काही प्रवासी बसलेले असताना त्याच्या मागे एक कपल रेल्वे स्थानकाच्या मधोमध उभे राहून एकमेकांचे चुंबन घेताना दिसत आहे. आजूबाजूची अजिबात पर्वा न करता हे कपल एकमेकांमध्ये बेफान होऊन गुंतलेले दिसून येत आहे. त्याचे हे लज्जास्पद कृत्य पाहून सोशल मीडियावर मात्र त्याच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा व्हायरल व्हिडिओ @alone_but_happy_21 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘यावर तुमचे मत द्या’ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी कपलच्या कृत्यावर आपले मत व्यक्त करत व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले आहे, “ही वासना आहे प्रेम नाही. प्रेम खाजगीत असते. या पिढीला लाज नाही, प्रेम नाही आदर नाही. फक्त ट्रेंड फॉलो करायचा आहे, काहीच बोलायचे नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे नक्की कोणते रेल्वे स्थानक आहे”.

हेही वाचा :

……..ते पुन्हा येत आहेत 21 वे मुख्यमंत्री म्हणून.….!

सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या लग्नाचे First Pics

एकनाथ शिंदेंचा काळ संपला, पक्षही फुटू शकतो; संजय राऊतांनी दिला इशारा