एआय वापरताना जीमेल लॉगिन केलंय? तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा स्कॅम;

जीमेल(gmail) वापरकर्त्यांना लक्ष्य करणारा एक नवीन आणि गुंतागुंतीचा AI घोटाळा उघड झाला आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनावट खाते पुनर्प्राप्ती विनंत्या स्वीकारण्याची फसवणूक केली जाते,असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. IT तज्ञ सॅम मिट्रोव्हिक यांनी त्यांच्या अनुभवाविषयी माहिती दिली आहे. या घोटाळ्याच्या आक्रमक पद्धतींमुळे लोक सहजपणे फसवले जाऊ शकतात.

वापरकर्त्यांना अचानक फोन किंवा ईमेलद्वारे जीमेल (gmail)खाते पुनर्प्राप्ती विनंती स्वीकारण्याचे संदेश येतात. ही विनंती साधारणत: वेगळ्या देशातून येते, सॅम यांच्या बाबतीत अमेरिकेतून रिक्वेस्ट आली होती.

जर वापरकर्त्यांनी ही विनंती नाकारली, तर थोड्या वेळाने अधिकृत गुगल क्रमांकावरून फोन येतो, जो अत्यंत विश्वासार्ह वाटतो. फोनवरील व्यक्ती अत्यंत व्यावसायिक, विनम्र आणि अमेरिकन आवाजात बोलत, आपल्या खात्यावर संशयास्पद हालचाली असल्याची माहिती देतात. यात वापरकर्त्यांनी परदेशातून लॉगिन केले आहे का, यासारखे प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे वापरकर्त्यांचा विश्वास वाढतो. यानंतर, बनावट ईमेल पाठवून खाते पुनर्प्राप्ती विनंती स्वीकारण्याची मागणी केली जाते, जेणेकरून घोटाळेबाजांना पूर्णत: खाते नियंत्रण मिळवता येईल.

तुमचे जीमेल खाते सुरक्षित ठेवण्याचे उपाय-

  1. जर तुम्हाला अनपेक्षित Recovery request आली, तर ती अजिबात स्वीकारू नका.
  2. गुगल कधीही थेट फोन करत नाही. संशयास्पद फोन कॉल आले, तर त्याची पडताळणी करा.
  3. ईमेल तपासा.गुगलकडून आलेल्या ईमेलमध्ये लहान चुकीच्या तपशिलांचा शोध घ्या, जसे की ‘To’ फील्ड किंवा डोमेन नाव.
  4. सुरक्षितता तपासा. नियमितपणे आपल्या खात्याचे सुरक्षाविषयक हालचाली तपासा.
  5. ईमेल हेडर तपासा. अधिक तांत्रिक वापरकर्त्यांसाठी, ईमेल हेडर तपासल्याने ईमेल खरी आहे की बनावट हे समजू शकते.

हेही वाचा:

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण…

विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा

आज वृद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; वृश्चिकसह 5 राशींना होणार डबल लाभ