आज ‘या’ राशींवर राहणार देवी ब्रह्मचारिणीची कृपा!

आज 4 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी आहे. संपूर्ण दिवस आणि रात्री शनिवारी पहाटे 5 वाजून 31 मिनिटांपर्यंत द्वितीया तिथी असणार आहे. त्याचबरोबर आज वैधृती योग(astrology) देखील जुळून आला आहे.

तसेच, आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या देवी ब्रह्मचारिणीची आज पूजा केली जाणार आहे. आज देवी ब्रह्मचारिणी देवी कोणत्या राशीवर(astrology) प्रसन्न राहणार, काय आशीर्वाद देणार ते पाहुयात.

मेष रास : आज तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तुमच्या हातून सामाजिक कार्य घडेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचा पगार वाढू शकतो. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ रास : कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. तुमचे कोणतेही काम आज यशस्वी होईल. तुमच्यावर देवी ब्रह्मचारिणीची कृपा राहील.

मिथुन रास : आज तुम्हाला जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत देखील प्रमोशन होऊ शकते. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल. आज तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल. आरोग्याच्या समस्या देखील दूर होतील.

कर्क रास : तुमचा नोकरीचा शोध पूर्ण होईल.मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. वाचनात मग्न व्हाल. आज जवळचा प्रवास योग आहे. जुने मित्र अचानक भेटतील. गप्पागोष्टी रंगतील.

सिंह रास : देवी ब्रह्मचारिणीची तुमच्यावर कृपादृष्टी राहील. बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन ठरेल. एकंदरीत आजचा दिवस आंनदी जाईल.

हेही वाचा:

इचलकरंजीत डॉल्बीचा अतिरेक: पोलीस निष्क्रिय, नागरिक त्रस्त

पाडापाडीचं राजकारण थांबवा, उमेदवारांना निवडून आणा – संभाजीराजेंचा समाजाला सल्ला

हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता ‘हा’ नेता फुंकणार ‘तुतारी’?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता