कोल्हापूर : गोकुळची पूर्ण ताकद लावतो, अध्यक्षांचा थेट मुख्यमंऱ्यांना फोन

राज्यातील सत्ता बदलामुळे जिल्ह्यातील राजकारणात त्याचा(just call) परिणाम झाला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या एकीमुळे संचालक मंडळांची मने जुळत असताना पुन्हा एकदा राज्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत गेला. त्याचा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारी संस्थांवर देखील परिणाम झाला.

माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ(just call) यांनी त्यावेळी एकत्र येत गोकुळ दूध संघ जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली. मात्र या लोकसभा निवडणुकीत हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने संचालक मंडळाची गोची झालेली आहे. अशातच गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी कॉल रेकॉर्डिंग क्लिप जिल्ह्यात व्हायरल झाली आहे. सध्या डोंगळे हे मुश्रीफ यांच्यासोबत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा एका बाजूला फोटो लावण्यात आला आहे. शिवाय वरच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावलेला आहे. या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांचा संवाद आहे. साहेब नमस्कार, आम्ही गोकुळची संपूर्ण ताकद दोन्ही विद्यमान खासदारांच्या सोबत लावत आहोत. या दोघांनाही निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. मात्र तुम्ही नव्हता.

संपूर्ण ताकतीने आम्ही संजय मंडलिक यांच्या बाजूने उभे आहोत. गोकुळची संपूर्ण ताकद संजय मंडलिक यांच्या बाजूने राहील अशी व्यवस्था आम्ही करतो. असा संवाद या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजयच्या मागे संपूर्ण ताकद लावा असा निरोप अरुण डोंगळे यांना देण्यात आला आहे.

गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक झाल्यापासून आमदार सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्ता परिवर्तन झाले. माझे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदावर अरुण डोंगळे विराजमान झाले. मात्र राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणानंतर अरुण डोंगळे हे मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. त्यातच गोकुळची संपूर्ण ताकद मंडलिक यांच्या बाजूने उभे राहील असा संवादाची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या संचालकांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात यंत्रणा पोहोचण्यास मदत होते. शिवाय जिल्ह्याच्या राजकीय केंद्रबिंदू म्हणून गोकुळ दूध संघाला पाहिले जाते. अरुण डोंगरे यांची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने यंदाच्या निवडणुकीत ही गोकुळचा वाटा तितकाच महत्त्वाचा आहे हे नक्की.

गोकुळमध्ये संचालक कोण कोणाकडे?
महायुती:
अरुण डोगळे, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौंगले, रणजित पाटील, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, एस. आर. पाटील,शोमिका महाडिक, अजित नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव.

महाविकास आघाडी:
विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, प्रकाश पाटील, बयाज़ी शेळके, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, अंजना रेडेकर, अंबरिश घाटगे

हेही वाचा :

PM मोदींना ‘पुतिन’ मॉडेल आणायचंय, हाच मोठा धोका; संजय राऊत यांचा घणाघात

तू सेक्सची निवड कर..; अरबाज खानचा मुलाच्या मित्राला अजब सल्ला, मलायकाची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबईविरुद्ध आरसीबीमध्ये ‘हाच’ संघ जिंकणार, चक्क श्वानाने सांगितलं भविष्य?