महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. आज 5 डिसेंबररोजी राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून महायुतीचे नेते आज मंत्रीपदाची शपथ घेतील. आज सायंकाळी शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. दुसरीकडे, सराफा बाजारात आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातू सोन्यात(Gold) चढ-उताराचे सत्र दिसून येत आहे. आज सकाळी सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.

या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत पडझड झाली. त्यानंतर त्यात उसळी आली. चांदीला 30 नोव्हेंबरपासून आघडी घेता आलेली नाही. सोमवार आणि मंगळवार सोन्याने(Gold) उसळी घेतली होती. तर, काल बुधवार 4 डिसेंबररोजी किमती खाली उतरल्याचे दिसून आलं. तर आज सकाळच्या सत्रात किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत.
सोमवारी 650 रुपयांची घसरण झाली. तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने 430 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, चांदीच्या किमतीमध्ये गेल्या 15 दिवसांत काही अंशी बदल झाला. मागील आठवड्यात चांदी 2500 रुपयांनी उतरली. या आठवड्यात सोमवारी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये इतका आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,392, 23 कॅरेट 76,086, 22 कॅरेट सोने 69,975 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,294 रुपये, 14 कॅरेट सोने 44,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा :
“2100 रुपयांचा हप्ता मिळणार का? महायुती नेत्याचा 15 लाखांचा उल्लेख चर्चेत”
निम्म्या राज्यावर वादळी पावसाचं सावट; थंडीचं पुनरागमन कधी?
‘या’ 3 राशींवर बरसणार शनीची कृपा; छू मंतर होतील सर्व अडचणी