वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला व्यापार, बौद्धिक क्षमता, एकाग्रता, बुद्धी आणि तर्क-वितर्काचा कारक ग्रह मानला जातो. ग्रहांचा(rashi) राजकुमार असणारा बुध ग्रह एका ठराविक कालावधीने नक्षत्र परिवर्तन करुन आपल्या स्थितीत बदल करतात.

सध्या बुध ग्रह मीन राशीत वक्री चाल करत आहे. तर, 6 एप्रिल रोजी याच राशीत बुध ग्रह मार्गी होणार आहे. बुध ग्रहाच्या मार्गी झाल्याने सर्व 12 राशींवर(rashi) याचा परिणाम दिसून येणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास
या राशीच्या पाचव्या चरणाचा स्वामी होऊन बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तसेच, या कालावधीत तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, व्यवसायात चांगला लाभ मिळे. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज पूर्ण होऊ शकतील. तसेच, कुटुंबात सुरु असलेले वाद लवकरच संपुष्टात येतील.
सिंह रास
सिंह राशीचा स्वामी होऊन या राशीच्या आठव्या चरणात बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. या राशीमुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं तुम्हाला लवकरच चांगलं फळ मिळेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं मार्गी होणं फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या सहाव्या चरणात बुध मार्गी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, परदेशात जाण्याच्या संधी लवकरच चालून येतील. धार्मिक कार्यात तुमचं जास्त मन रमेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा चांगला वाव मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
उन्हाळ्यात सतत थकवा येतोय? मग ‘हे’ पेय प्या आणि क्षाराची पातळी वाढवा!
पुढील 24 तासांत पाऊस झोडपणार, तुमच्या भागात काय परिस्थिती?
सावधान! चहाचा घोट पाडू शकतो आजारी; एका दिवसांत किती कप चहा प्याल?