सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी(opportunity) तुमच्याकडे आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
विमा मेडिकल ऑफिसर ग्रेड II पदासाठी ही (opportunity)भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.कर्मचारी राज्य विमा महामंडळात ६०८ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ३१ जानेवारी २०२५ आधी अर्ज करावेत.
या नोकरीसाठी उमेदवारांची भरती आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील २५४ जागा रिक्त आहेत. राखीव प्रवर्गासाठी ३४९ जागा रिक्त आहेत.या नोकरीमध्ये दिव्यांगांसाठी ९० पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असावी.
या नोकरीबाबत अधिसूचना ESIC च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे.
हेही वाचा :
डिसेंबरची ‘ओवाळणी’: बहिणींसाठी सरकारचा खास निर्णय!
तुफान राडा! कॉलेजच्या आवारात तरुणींची जोरदार हाणामारी; एकमेकींना धु धु धुतले… Video Viral
बीड आणि परभणी प्रकरण गाव आणि कुटुंबियांचे आक्रंदन