सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एसबीआय बँकेमध्ये(sbi bank) मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी जराही वेळेचा विलंब न करता लगेच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. ही भरती कोणत्या पदांसाठी होणार आहे, तसेच यासाठी वयाची आणि शिक्षणाची अट काय असणार, याबाबत जाणून घेऊयात.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून(sbi bank) स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ही भरती प्रक्रिया अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रातील पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. 22 नोव्हेंबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या 12 डिसेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. 12 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक अभियंत्यासह इतर अनेक पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कौशल्य आणि अनुभव असणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे ही गरजेचे आहे. तसेच इच्छुक उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 रुपये मासिक वेतन दिले जाईल. याशिवाय अतिरिक्त भत्ते आणि लाभही बँकेकडून देण्यात येतील.
हेही वाचा :
मोठी बातमी! एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचे कर्करोगाने निधन, पत्नी आणि मुलींवर कोसळला दुःखाचा डोंगर!
विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…