लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच(change) नवीन फीचर्स घेऊन येत असते. हल्ली तर कंपनी WhatsApp वर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचे अनेक फीचर्स देखील जोडत आहे. या सर्व अपडेटनंतर आता आणखी एका नवीन अपडेटबद्दल माहिती समोर आली आहे. WhatsApp आता लवकरच अॅपमधील त्यांच्या मेटा AI चॅटबॉटसाठी एक नवीन आणि सुधारित इंटरफेस आणू शकते. ज्यामुळे मेटा AI चॅटबॉट एका नवीन रुपात युजर्सच्या भेटीला येणार आहे.

एका नवीन लीकनुसार, WhatsApp युजर्सच्या AI चॅटबॉट वापरण्याच्या आणि अॅक्सेस करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करत आहे. या नवीन इंटरफेस अपडेटमध्ये ऑटोमॅटिक व्हॉइस मोड आणि प्रॉम्प्ट सजेशन्स सारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये असतील, जी युजर्सना चॅट सुरू करण्यास मदत करतील. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच सांगितले की 2025 मध्ये मेटा AI लक्षणीयरीत्या अपग्रेड केले जाईल.
एका नवीन अहवालानुसार, WhatsApp युजर्सचा मेटा AI वापरण्याचा अनुभव अधिक सहज आणि सोपा व्हावा, यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठीच आता नवीन अपडेट आणलं जाणार आहे. या नवीन अपडेटमध्ये ऑटोमॅटिक व्हॉइस मोड आणि प्रॉम्प्ट सजेशन्ससारखी वैशिष्ट्ये आढळू शकतात, (change)जी युजर्सना चॅटिंग सुरू करण्यास मदत करतील, तथापि, ही वैशिष्ट्ये सध्या बीटा चाचणीत आहेत, त्यामुळे सर्व यूजर्स ते वापरू शकत नाहीत. परतुं लवकरच हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
मेटा AI इंटरफेसमध्ये नवीन काय असेल?
WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp अँड्रॉइड 2.25.5.22 बीटा अपडेटमध्ये मेटा AI चॅटबॉटसाठी नवीन इंटरफेस आणणार आहे. अहवालानुसार, WhatsApp च्या चॅट स्क्रीनच्या तळाशी-उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेटा AI आयकॉनला जास्त वेळ दाबल्याने आता एक नवीन इंटरफेस ओपन होईल आणि व्हॉइस मोड अॅक्टिवेट होईल. सध्याच्या चॅट विंडोच्या तुलनेत या नवीन मेटा AI इंटरफेसमध्ये मोठा बदल दिसून येतो. स्क्रीनचा मोठा भाग चॅटबॉटच्या लोगोने आणि “Listening” या मजकुराने व्यापलेला असेल.
मेटा एआय व्हॉइस मोड कसा काम करेल?
जेव्हा युजर्स या इंटरफेसमध्ये असतात तेव्हा ते बोलून AI ला प्रश्न विचारू (change)शकतात. जेव्हा AI युजर्सचा आवाज ऐकतो, तेव्हा अँड्रॉइड स्टेटस बारमध्ये एक हिरवा मायक्रोफोन आयकॉन दिसेल, जो मायक्रोफोन अॅक्टिवेट असल्याचे दर्शवेल. युजर्स इच्छित असल्यास मायक्रोफोन बटण टॅप करून किंवा थेट मजकूर टाइप करून टेक्स्ट मोडवर स्विच करू शकतात. हे मेटा AI फक्त तोपर्यंत ऐकत राहील जोपर्यंत युजर्स या इंटरफेसमध्ये आहे. जर युजर्सने ही विंडो बंद केली तर AI ऐकणे थांबवेल आणि सेशन संपेल. हा नवीन इंटरफेस भविष्यातील अपडेटमध्ये युजर्ससाठी उपलब्ध करून दिला जाईल, जरी हे अपडेट कधी येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे WhatsApp ने या मेटा AI डिझाइनची अधिकृत घोषणा केलेली नाही.
हेही वाचा :
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील
महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष