महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

राज्यातील पेट्रोलच्या(Petrol) किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.

जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 2 डिसेंबररोजीचे इंधनदर सुधारले आहेत. आजच्या पेट्रोल(Petrol)-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत.

महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.71 रुपये प्रतिलिटर आहे. मागच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबररोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.87 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.16 टक्क्यांनी कमी झाली आहे.

तर, डिझेल 91.36 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. काल 1 डिसेंबररोजी देखील महाराष्ट्रात डिझेलची किंमत सारखीच होती. म्हणजेच डिझेलच्या दरात कालपासून कोणताही बदल झाला नाही.

मेट्रो सिटीमधील इंधनदर
दिल्ली पेट्रोल (प्रति लिटर ) 94.77 तर डिझेल 87.67
मुंबई पेट्रोल (प्रति लिटर ) 104.71 तर डिझेल 91.36
कोलकाता पेट्रोल (प्रति लिटर ) 104.95 तर डिझेल 91.76
चेन्नई पेट्रोल (प्रति लिटर ) 100.75 तर डिझेल 92.34
बेंगलुरु पेट्रोल (प्रति लिटर ) 99.84 तर डिझेल 85.93

हेही वाचा :

“महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर…”; जरांगे पाटलांची नवी मोठी घोषणा

आज जुळून आला अतिशय शुभ योग; 5 राशींचं नशीब लखलखणार

सोन खरेदीदारांसाठी मोठी बातमी! ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण