महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण (yojna)योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चा खोट्या असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना(yojna) बंद करणार नसल्याचे सांगितले आहे. ‘ज्या योजनांचे आश्वासन दिले ती एकही योजना बंद करणार नाही. लाडक्या बहिणींना आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या खात्यात डिसेंबर अखेर हप्ता मिळणार आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे..
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ५ हप्ते देण्यात आले आहेत.महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याला हप्ता एकत्र मिळाला होता. त्यानंतर आचारसंहिता लागली. विधानसभा निवडणुका झाल्यावर महिलांना हप्ता येईल, असं महिलांना वाटले होते. मात्र, अद्यापही पैसे आलेले नाहीत.
दरम्यान, आता योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबरच्या अखेरीस येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या दोन आठवड्यात पैसे येऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना लवकरच सहावा हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीनंतर बंद होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. या चर्चांना आता देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. त्याआधी मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची अफवा असल्याचे सांगितले आहे. याचसोबत लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचेही सांगत होते. मात्र, या योजनेचे निकष बदलणार नसल्याचेही सांगितले आहे.
हेही वाचा :
विमानतळावर विराट कोहलीचा संताप; ऑस्ट्रेलियन पत्रकाराला झोडपले शब्दांनी
सासऱ्याचा जावयावर अॅसिड हल्ला: हनिमूनचं कारण ठरलं वादाचं केंद्र
१५ रुपयांच्या वडापावने लाखमोलाचे जीव वाचले; अपघाताच्या काही मिनिटं आधीच…