ऍपल आपल्या भारतीय युजर्ससाठी एक मोठी खुशखबर घेऊन येत आहे. कंपनीने (iphone)घोषणा केली आहे की ते आपली नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवा, ऍपल इंटेलिजन्स भारतात लाँच करणार आहे.हे नवीन फीचर पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 पासून वर उपलब्ध होईल. ऍपलचे म्हणणे आहे की ही AI सेवा युजर्सना स्मार्ट आणि इंटेलिजेंट पद्धतीने अधिक चांगला अनुभव देईल.ऍपल इंटेलिजन्ससह तुम्हाला iPhone मध्ये अनेक नवीन आणि प्रगत फीचर्स मिळतील. यापैकी काही प्रमुख फीचर्समध्ये स्मार्ट रिप्लाय , AI पॉवर्ड रायटिंग टूल्स , नोटिफिकेशन समराइज आणि इमेज एडिटिंग यांचा समावेश आहे. ही सर्व फीचर्स खास करून तुमची दैनंदिन कामे अधिक सोपी करतील.
Siri ला देखील पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट आणि शक्तिशाली केले जाईल, ज्यामुळे तुमच्या आवाजावर नियंत्रण ठेवणे आणखी सोपे होईल.ऍपल इंटेलिजन्स वापरण्यासाठी iPhone मध्ये थोड्या जास्त स्टोरेजची आवश्यकता असू शकते. रिपोर्ट्सनुसार, हे फीचर वापरण्यासाठी युजर्सना जवळपास 7GB स्टोरेज ची आवश्यकता असेल. मात्र, ऍपलने यावेळी खास लक्ष दिले आहे की ही फीचर्स डिव्हाइसवरच काम (iphone)करतील, ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पूर्णपणे सुरक्षित राहील.हे फीचर खासकरून iPhone 16 सिरीज, iPhone 16 Pro आणि iPhone 15 Pro मॉडेल्सवर उपलब्ध होईल. भारतात सध्या हे फीचर उपलब्ध नाही
परंतु टिम कुक यांनी सांगितल्याप्रमाणे, लवकरच iOS 18.4 अपडेटसह ते रोलआउट केले जाईल. ऍपल इंटेलिजन्स स्थानिक इंग्रजी भाषेत लाँच केले जाईल, ज्यामुळे भारतीय युजर्सना त्याचा अधिक चांगला अनुभव मिळेल. यानंतर, हळूहळू इतर भाषा जसे की फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज, जपानी, कोरियन आणि चीनी देखील यात जोडल्या जातील. खासकरून भारत आणि सिंगापूरसाठी लोकल इंग्लिश सपोर्ट मिळेल, ज्यामुळे आणखी युजर्सना ते वापरण्यास मदत होईल.ऍपल इंटेलिजन्सबाबत टिम कुक म्हणाले की (iphone)कंपनी यावर खूप मेहनत घेत आहे आणि त्यांची इच्छा आहे की युजर्सना एक स्मार्ट, कम्फर्टेबल आणि प्रायव्हसी-फोकस्ड AI अनुभव मिळावा.
त्यांनी हे देखील सांगितले की या फीचरद्वारे युजर्सना त्यांच्या डिव्हाइसवर पूर्वीपेक्षा अधिक नियंत्रण आणि अचूकता मिळेल.ऍपल इंटेलिजन्सचे हे नवीन अपडेट iOS 18.4 सह एप्रिल 2025 मध्ये येईल, ज्यामुळे युजर्सना त्याचा फायदा घेता येईल. या अपडेटसह इतर अनेक फीचर्स आणि सुधारणा देखील केल्या जातील.
हेही वाचा :
वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा; लाखो बळी जाणार, कारण वाचून हादरून जाल
भाजपचा ‘मास्टर प्लॅन’…, आयकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांची जिंकली मने! आता…
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचा धिंगाणा; मोबाईल टॉवरवर चढला अन्… Video Viral