सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पदांसाठी भरतीला सुरुवात

टेरिटोरिअल आर्मी(army) मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये विविध पदांचा विचार करण्यात येणार आहे. आर्मी तसेच पॅरामिलिटरी फोर्समध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराना या भरतीचा लाभ घेता येणार आहे. जर तुम्ही या भरतीमध्ये भाग घेण्यास इच्छुक आहात, तर नक्कीच या भरती प्रेक्रियेसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. या अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात संपूर्ण सखोल माहिती जाहीर करण्यात आली आहे.

टेरिटोरिअल आर्मी(army) या संस्थेकडून या भरतीच्या प्रक्रियेला आयोजित केले गेले आहे. या संस्थेच्या नियंत्रणाखाली गोरखा रायफल्समध्ये रिक्त असलेल्या १८४ जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. विविध विभागातील रिक्त पदांचा समावेश या भरतीच्या प्रक्रियेमध्ये करण्यात आला आहे.

सैनिक तसेच धार्मिक शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून केला जाणारा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना लवकरच अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.jointerritorialarmy.gov.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑक्टोबरच्या २१ तारखेपासून अर्ज करता येणार आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्यास फार असा मोठा काळ देण्यात आलेला नाही. ऑक्टोबरच्या २५ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये उमेदवारांना आपली अर्ज प्रक्रिया हुरकायची आहे, वेळ निघून गेल्यास करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीमध्येच उमेदवारांनी या अर्जाला पूर्णत्वास आणायचे आहे.

या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया आयोजित केली जाईल. उमेदवारांना शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. यासाठी अर्ज कर्त्या उमेदवारांन एका ठरविक वेळी बोलावले जाईल. तसेच उमेदवारांना दस्तऐवजांची तपासणी, वैद्यकीय चाचणी तसेच मुलाखतींना पात्र होणे अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेच्या या सर्व टप्प्यांना पात्र उमेदवार या भरतीमध्ये स्थान मिळवण्यास नियुक्त होण्यास पात्र ठरेल.

TA च्या या भरतीविषयी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी या जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. त्यातील सर्व बाबी काळजीपूर्वक नजरेखालून घ्यावीत. मगच अर्जाच्या प्रक्रियेकडे वळावे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी तसेच या जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी www.jointerritorialarmy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

हेही वाचा:

रतन टाटा यांचा वारसदार ठरला! ‘या’ व्यक्तीवर सोपवली जबाबदारी

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला करणार रामराम? हरभजनने केला मोठा खुलासा

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शिंदे सरकारची ‘सोनेरी’ भेट; ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज मुदतीस वाढ