बँक (bank)कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्यातून पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत इंडियन बँकिंग असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात शुक्रवारी बैठक होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सरकारची भूमिका सकारात्मक
यापूर्वी अर्थ मंत्रालयाने बँका आठवड्यातून फक्त पाच दिवस उघडण्यास ‘हरकत नाही’ असे म्हटले होते. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची ही दीर्घकालीन मागणी या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन सुट्ट्या मिळतील.
वेतनवाढ आणि इतर मागण्या
या बैठकीत वेतनवाढ आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी यासारख्या इतर मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. एलआयसीमध्ये मे 2021 मध्ये पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी झाल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांकडून ही मागणी करण्यात येत होती.
कामाच्या तासांत वाढ
या प्रस्तावात असेही म्हटले आहे की, प्रत्येक कामाच्या दिवशी बँका नियमित बंद होण्याच्या वेळेपेक्षा 40 मिनिटे जास्त वेळ उघड्या राहतील. यामुळे बँकेच्या कामाच्या तासात वाढ होईल.
अंतिम निर्णय
या प्रस्तावासंबंधी अंतिम निर्णय शुक्रवारच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे बँक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
पोलीस भरती चाचणीत तरुणाचा मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रात दूधाचा दर सर्वात कमी, अमूलच्या फायद्यासाठी सरकारकडून दूध भुकटीची आयात
विराट, रोहितनंतर आता ‘या’ दिग्गज खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा