भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ने काही दिवसांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस-ओनली रिचार्ज प्लॅन आणण्याचे आदेश दिले होते. यानंतर, अनेक कंपन्यांनी कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे देणारे प्लॅन सादर केले. आता, भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनेही(BSNL) डेटाशिवाय दोन नवीन रिचार्ज प्लॅन आणले आहेत.
डेटा न वापरणाऱ्यांसाठी खास प्लॅन:
ट्रायच्या या आदेशाचा फायदा अशा लोकांना होणार आहे, जे डेटा वापरत नाहीत. बीएसएनएलने(BSNL) यापूर्वी 99 रुपये आणि 439 रुपयांचे प्लॅन सादर केले होते, ज्यात फक्त कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळतो.
बीएसएनएलचे नवीन डेटा फ्री प्लॅन:
बीएसएनएल बिहारने आपल्या एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत दोन नवीन प्लॅन्सची माहिती दिली आहे. हे नवीन प्लॅन 147 रुपये आणि 319 रुपयांचे आहेत.
बीएसएनएलच्या 147 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि फ्री एसएमएसचा फायदा मिळतो.
बीएसएनएलच्या 319 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 65 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये देखील अमर्यादित कॉलिंग आणि फ्री एसएमएसचा फायदा मिळतो. बीएसएनएलचे हे नवीन प्लॅन अशा लोकांसाठी फायदेशीर आहेत, ज्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएसची गरज आहे. डेटा न वापरणाऱ्यांसाठी हे प्लॅन एक चांगला पर्याय आहेत.
हेही वाचा :
भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या…
मैदानात विराटचं चाललंय काय? जर्सी वर केली दातात पकडली अन्…; ‘ती’ कृती चर्चेत
बॉलिवूडमध्येही रंगणार ‘स्क्विड गेम’ सारखा मृत्यूचा खेळ; टीझर पाहताच म्हणाल- “वेलकम टू द जंगल”!