केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी(news) समोर येत आहे. केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत वाढ केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत ३ टक्क्याने वाढ करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो तर महागाई सवलत ही पेन्शनधारकांना (news)दिली जाते.सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता ३ टक्के वाढ होईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण महागाई भत्त हा ५३ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
७ मार्च २०२४ रोजी शेवटचा महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू झाली होती. त्यावेळी एकूण ५० टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यातील वाढ दरवर्षी जानेवारीपासून लागू केली जाते.
महागाई भत्त्यातील वाढ ही अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक च्या आधारे निश्चित केली जाते. विविध क्षेत्रातील किरकोळ बाजारातील किंमतीमधील बदलांचे परिक्षण करुन ही वाढ निश्चितकेली जाते.सप्टेंबर २०२० पासून, सरकारने २०१६ च्या नवीन ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे महागाई भत्त्यात वाढ केली आहे.
ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भत्त्यांमध्ये वाढ होईल त्यामध्ये वाहतूक भत्ता, दिव्यांग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता, मुलांचे शिक्षण भत्ता, घरभाडे भत्ता आणि एचआरएचा समावेश होतो. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये?, ‘या’ दिवशी येणार पैसे?
केसाला सुद्धा धक्का लागला तर पूर्ण जिल्हा पेटवून टाकू, काँग्रेस नेत्याचा धमकी वजा इशारा
भाजप आणि अजित पवार गटामध्ये २० जागांवर मतभेद: महायुतीत बंडखोरीची चिन्हे