लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! २१०० रुपये मिळणार…

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी काल महत्त्वाचं(important) वक्तव्य केलं आहे. काल विधानसभेत अजित पवारांना लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. दरम्यान, आता २१०० रुपयांबाबत अजित पवारांनी २१०० रुपयांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देणार,आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. सगळी सोंगे आणता येतात, पण पैशांचं सोंग आणता येत नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. यामुळे आता २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

अर्थसंकल्पातील वित्त, अन्न व नागरी विभागाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. तर लाडकी बहीण योजनेतील महिलांना २१०० रुपये कधी देणार, अशी विचारणा सदस्यांनी काल विधानसभेत(important) केली होती. त्यावर अजित पवारांनी ही माहिती दिली आहे.

एप्रिलचा हप्ता कधी येणार?
लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यापर्यंत सर्व हप्ते देण्यात आले आहेत.दरम्यान, आता एप्रिलचा हप्ता मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. पुढच्या महिन्यात रामनवमीच्या मूहूर्तावर एप्रिल महिन्याचे पैसे कदाचित येऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी देणार याची (important)अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, लाडकी बहीण योजनेत ५ वर्षात कधीही २१०० रुपये देण्याची घोषणा होऊ शकते. जाहीरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या कालावधीत लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती आदिती तटकरेंनी मध्यंतरी दिली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

हेही वाचा :

मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू

प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral

‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हा