नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; खासगी कंपन्यांमध्येही होणार भरघोस पगारवाढ?

नोकरी,पगारवाढ आणि सुट्ट्या याचसंदर्भातील चर्चा आपण नोकरदार(private companies) वर्गाकडून सातत्यानं ऐकतो. दिवसभरातील कामाचे तास, त्यातून मिळणारे वेतन, आणि संस्थेकडून मिळणाऱ्या इतर सोयीसुविधांच्या बाबतीत कर्मचारी नाराजीचा सूर आळवत असतात. त्यातही पगारवाढीच्या दिवसात जर मनासरखा पगार वाढवून मिळाला नाही, तर ही मंडळी नोकरी सोडून एखाद्या दुसऱ्या संस्थेत चांगल्या संधीच्या शोधात निघतात. तुम्ही देखील नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी नक्की वाचा.

या वर्षी मात्र वरिष्ठ अधिका-यांसाठी आनंदाची(private companies) बातमी आहे. ‘मायकेल पेज इंडिया सॅलरी गाइड 2024’ च्या एका अहवालानमुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावण आहे. या अहवालात आगामी काळात नोकरदारांना चांगला पगार मिळू शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

माहितीनुसार, या वर्षी वरिष्ठ पदांवरील वेतनवाढ सरासरी 20 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ‘मायकेल पेज इंडिया सॅलरी गाइड 2024’ यांच्या माहितीनुसार, पारंपारिक उद्योगांमध्ये, विशेषतः उत्पादन आणि ऑपरेशनल भूमिकांमध्ये लोकांची भरती करण्यात येणार आहे. याशिवाय डेटा ॲनालिटिक्स, जनरेटिव्ह एआय आणि मशीन लर्निंग यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मागणीही वाढली आहे.

मायकेल पेज ग्रुपचे एमडी अंकित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५-४५ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. मध्यम पातळीवरील अधिकाऱ्यांची पगारवाढ ३०-४० टक्के आणि वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांसाठी २०-२० टक्के पगार वाढ होऊ शकते. त्यासोबतच उत्पादन क्षेत्रात कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांना २०-४० टक्के, कनिष्ठ अधिकाऱ्यांना २५-४५ टक्के आणि वरिष्ठांना २०-४० टक्के पगारवाढ मिळणे अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा :

RCB विरुद्ध सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! विकेटकीपर स्पर्धेतून बाहेर…

गुगलचं यूजर्सना खास गिफ्ट! फोटो एडिटिंगचे एआय टूल्स सगळ्यांना मिळणार मोफत

महाराजांची माफी मागा; कोल्हापूरकर सहन करणार नाही; मंडलिकांच्या वक्तव्याचा सतेज पाटलांकडून समाचार…