‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार नुकसान भरपाई

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी(farmers) आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. मात्र आता या अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 412 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं(farmers) प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला होता. यामध्ये कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांना अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात मोठं नुकसान झालं होत.

दरम्यान आता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची मदत म्हणून जालना जिल्ह्यात तब्बल 412 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच यामधील सर्वाधिक निधी हा अंबड तालुक्यासाठी 150 तर घनसावंगी तालुक्यासाठी 139 कोटी रुपयांचा निधी मंजूर आज मंजूर करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात खरीप हंगामातील जिरायती पिकांमधील तब्बल 2 लाख 26 हजार 358 हेक्टर क्षेत्रावर तर 28 हजार 586 हेक्टर क्षेत्रावर फळ पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यानंतर कृषी विभागाने केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल प्राप्त झाला होता. मात्र त्यानंतर जालना जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी केलेल्या मागणीपोटी शासनाने तब्बल 412 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

दरम्यान, यामध्ये जिरायती पिकांसाठी तब्बल 13 हजार 600, तर बागायती पिकांसाठी 27 हजार रुपये तर फळ पिकांसाठी 36 हजार रूपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा :

“सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! जाणून घ्या आजचे दर”

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत वादाची ठिणगी…

आदित्य ठाकरेंचा इशारा अन् दादरच्या हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटीसीला स्थगिती