गणेश मंडळासाठी शुभ वार्ता! मंडळाच्या कार्यालयाचं भाडं होणार कमी

राज्य सरकारने गणेशोत्सव मंडळांना शुभ वार्ता दिलीय. वर्षभर कार्यक्रम(rent) राबवणाऱ्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या कार्यालयाचं भाडं कमर्शियल दराप्रमाणे भाडं घेतलं जातं. ते रेसिडेन्शियल दराने घ्यावं, अशी मागणी केली होती. सरकारने ही मागणी पूर्ण केलीय.

कमर्शियल दराने घेतल्यामुळे मोठी थकबाकी होती. त्याच्यावरील व्याज(rent) रद्द करावं आणि भाड्याच्या रकमेत 50 टक्के कपात करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अग्निशामन दलाचे लाखो रुपये भाडे मंडळाला भरावं लागत होतं. ते पूर्णपणे भाडे माफ करण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

पुढे बोलतांना केसरकर म्हणाले, मूर्तिकाऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली. मूर्तिकारांना साहित्य सबसिडी योजना राबवण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

लालबागचा राजा किंवा इतर मोठ्या मंडळाच्या आजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळात मोफत करण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा केला, जाईल यासाठी विशेष इनिशेटिव्ह घेतला जाणार आहे. गणेशोत्सव मुंबईच्या लोकल ट्रेन रात्रभर चालू ठेवण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला करणार आहोत.

हेही वाचा :

हद्दपार असतानाही धमकी! इचलकरंजी शहरातील केसरी गँगचा गुंड,म्होरक्याही ताब्यात….

सामान्यांसाठी मोठी खुशखबर! महागाईत आली स्वस्ताई, महागाईचा आगडोंब उसळला

संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभेला एकत्र लढण्याच्या हालचाली