नवी दिल्ली : टी २० वर्ल्ड कपनंतर आता रोहित शर्मासाठी अजून एक आनंदाची बातमी(t20 world cup) आली आहे. कारण आयसीसीने एक महत्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार रोहित शर्मा आणि त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी २० वर्ल्ड कप(t20 world cup) जिंकला. त्यानंतर रोहित शर्मा सुट्टीवर गेला होता. पण त्याला सुट्टी अर्धवट सोडून श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी जावे लागले. श्रीलंकेच्या दौऱ्यात रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. या मालिकेत सर्वाधिक धावा या रोहित शर्माच्या नावावर होत्या.
रोहित शर्माने या मालिकेत दोन अर्धशतकांसह दिडशे धावांचा टप्पा ओलांडला होता. एकिकडे भारताचे फलंदाज अपयशी ठरत असले तरी रोहितची बॅट मात्र चांगलीच तळपली होती. पण रोहित बाद झाल्यावर मात्र भारताचा डाव गडगडायचा आणि त्यामुळेच भारताला वनडे मालिकेत एकही विजय मिळवता आला नाही. पण रोहितच्या कामगिरीची दखल आता आयसीसीने घेतली आहे.
रोहित शर्माने वनडे मालिकेत दमदार कामगिरी केल्यामुळे आयसीसीने क्रमवारीत रोहित शर्माला मानाचे स्थान दिले आहे. रोहित आता वनडे क्रमवारीत भारताचा अव्वल खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा यापूर्वी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. श्रीलंकेतील वनडे मालिकेत त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळे आता क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. रोहित शर्माने यावेळी भारताच्या शुभमन गिलला पिछाडीवर टाकले आहे. यापूर्वी गिल दुसऱ्या आणि रोहित तिसऱ्या स्थानावर होता. आता रोहितने दुसरे स्थान पटकावले आहे.
रोहितला आता क्रमवारीत अव्वल स्थानावर जाण्याचे वेध लागलेले असतील. पण अव्वल स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे. बाबर आझमच्या खात्यात ८२४ गुण आहेत. रोहित शर्माने ७६५ गुण कमावले आहेत. रोहित शर्मा आणि गिल यांच्यात फक्त दोन गुणांचा फरक आहे. गिलच्या खात्यात ७६३ गुण आहेत. विराट कोहली या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे, कोहलीच्या खात्यात ७४६ गुण आहेत.
भारताचे तीन खेळाडू दोन, तीन आणि चार या स्थानांवर आहेत. पण पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे. त्यामुळे आता पहिल्या स्थानावर भारताचा कोणता खेळाडू पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
हेही वाचा :
गणेश मंडळासाठी शुभ वार्ता! मंडळाच्या कार्यालयाचं भाडं होणार कमी
संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभेला एकत्र लढण्याच्या हालचाली
हद्दपार असतानाही धमकी! इचलकरंजी शहरातील केसरी गँगचा गुंड,म्होरक्याही ताब्यात….