पिंपरी : सणांपासून निवडणुकीपर्यंत सततच्या बंदोबस्तात व्यस्त असलेले पोलीस यापुढे स्वतःचा वाढदिवस(birthday) हक्काची सुट्टी घेऊन कुटुंबासोबत साजरा करू शकणार आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या विविध शाखांना दिले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या वाढदिवसाकरिता(birthday) सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस दल हे प्रशासनिक दृष्ट्या व नागरिकांप्रती जागरूक राहून काम करीत असते. वेळप्रसंगी त्यांना वैयक्तिक कामे असतानाही ते रजेवर जाऊ शकत नाहीत.
पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना दैनंदिन कामाच्या व्यापामुळे बरेचदा स्वतःचे वाढदिवस असतानाही कामाकरिता हजर होणे व आपल्या कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नाही. तसेच दैनंदिन कामाच्या व्यापामुळे त्यांच्यात ताणतणाव निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. या सर्व बाबींचा विचार करून यापुढे त्यांना त्यांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला आहे.
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी हे पोलीस ठाण्यातील ज्यांचा वाढदिवस आहे. त्या अधिकारी व कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश हे संबंधितांना देतील, असेही पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील खूप तरुण तरुणी आहोरात्र मेहनत करत असतात त्यातील काही यशस्वी होतात तर काही अपयशी. अपयशाला कधी कधी अपुऱ्या किंवा चुकीच्या माहिती कारणीभूत असतात.
पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी दोन्ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. व्यायाम आणि अभ्यासाबरोबरच मन शांत ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परीक्षेत जितके महत्त्व व्यायाम आणि शारीरिक क्षमतेला आहे तितकेच महत्त्व बौद्धिक आणि आकलन क्षमतेला आहे. त्यामुळे रोज अभ्यास करणे आवश्यक ठरते.
- दररोजची वर्तमानपत्रे, पाक्षिकं वाचणे.
- मागील वर्षांचे पेपर सोडवणे.
- अभ्यास करताना महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवणे.
- वैकल्पिक पुस्तकांचे वाचन.
- गणितं सोडवण्याचा सराव करणे.
परीक्षेमधील 70 टक्के गोष्टी सारख्याच असतात. फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलेलं असतं. 30 टक्के प्रश्न नवीन माहितीवर आधारित असतात. नजिकच्या पोलीस प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ शकता, जेणेकरून नेमका अभ्यासकम आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.
पोलीस भरतीसाठीची तयारी, अर्ज भरणे, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, अंतिम यादी लागणे, प्रशिक्षण हा संपूर्ण कालावधी लक्षात घेतल्यास पोलीस शिपाई म्हणून रुजू होईपर्यंत किमान 2 वर्षांचा कालावधी जातो.
हेही वाचा :
मोठी बातमी! बिहारमध्ये खान सरांना अटक, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
बॅलेट पेपरवर मतदान घ्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या इशारा
शरद पवार गटाला मोठा झटका, आणखी एक बडा नेता अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार