वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल, तर तुम्हाला HSRP नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. राज्य सरकारने याच HSRP नंबरप्लेटबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वाहनचालकांना(vehicle) दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी(vehicle) HSRP नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. 2019 पूर्वीच्या वाहनांना ही नंबरप्लेट बसवणे बंधनकारक असून, त्यासाठी 30 एप्रिल 2025 ही अंतिम तारीख आहे. या मुदतीत नंबरप्लेट न बसवल्यास दंड भरावा लागू शकतो.

पूर्वी HSRP नंबरप्लेट लावण्यासाठी, वाहनाचे रजिस्ट्रेशन ज्या शहरात आहे, त्याच शहरात जावे लागत होते. मात्र, आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पुणे शहरातील वाहनधारक पुणे शहरातील रजिस्ट्रेशन सेंटर निवडू शकतात. याचा अर्थ, ज्यांच्या वाहनांचे रजिस्ट्रेशन दुसऱ्या शहरात आहे, ते देखील पुण्यातील केंद्रातून HSRP नंबरप्लेट मिळवू शकतात.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात आणि वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. या प्लेटवर HSRP होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाचे इंजिन आणि चेसिस नंबर नमूद केलेला असतो.

हा नंबर अनोखा असतो आणि प्रेशर मशीनद्वारे लिहिला जातो. HSRP नंबरप्लेटवर अशोक चक्र असलेला होलोग्राम असतो, जो नष्ट करणे शक्य नसते. या प्लेटवर वाहन मालकाचा नोंदणी क्रमांक आणि 7-अंकी लेसर कोड असतो, जो प्रत्येक प्लेटवर वेगळा असतो. HSRP नंबरप्लेटमुळे वाहनाचे ट्रॅकिंग करणे सोपे होते.

हेही वाचा :

१३, १४ अन् १५ मार्चला बँकांना सुट्टी

WhatsApp चे 5 नवीन फीचर्स भारतात लाँच, जाणून घ्या काय आहे खास

आता 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार; पण जुन्या नोटा…