महिला सशक्तीकरणासाठी सुरू केलेल्या महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत (Yojana)आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर महिलांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. या आठवड्यात सहावा हप्ता जमा झाला असून, जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना लवकरच १५०० रुपये मिळतील.

महिलांच्या संक्रातीसाठी गोड बातमी
संक्रातीनिमित्त महिलांना सातवा हप्ता देण्याचे नियोजन असून, यामुळे महिलांची संक्रात गोड होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. महिलांनी आधार कार्ड व बँक खात्याची सीडिंग पूर्ण केलेली असल्यासच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा(Yojana) लाभ घेण्यासाठी महिलांनी सीडिंग प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेत आर्थिक वाढीचे आश्वासन
मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याचा विचार असून, महिलांना दर महिन्याला २१०० रुपये देण्याची तरतूद करण्यात येईल. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि त्या अधिक सक्षम बनतील.
महिलांना कशी मिळेल ही रक्कम?
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. आधार कार्ड व बँक खाते सीडिंग नसल्यास संबंधित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी आणि सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात पडणार पैशांचा पाऊस? फक्त ‘हे’ 5 स्टॉक खरेदी करा
चहामुळे वाढतोय पित्त, अॅसिडिटीचा त्रास? मग चहा बनवताना मिक्स करा ‘हा’ १० रुपयांचा पदार्थ
घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्ट ब्रोकली बीटरूट सॅलड