देशातील तरुणांसाठी खुशखबर! बेरोजगारीच्या संकटात टाटांनी दाखवलं मोठं मन

मुंबई : बेरोजगारीच्या संकट काळात टाटांची दिग्गज कंपनी देशातील तरुणांना(youth) मोठी खुशखबर घेऊन आली आहे. गेल्या एका वर्षापेक्षा अधिक काळापासून आयटी (तंत्रज्ञान) क्षेत्र मंदीच्या कचाट्यात सापडले आहे ज्याचा विपरीत परिणाम लाखो लोकांच्या रोजगारावरही झाला आहे.

जगभरातील तब्बल दोन लाख लोक(youth) बेरोजगार झाले आहेत. IT क्षेत्रात अजूनही सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेही महत्त्वाची भूमिका बजावली मात्र, ताळेबंदीच्या या कळत देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठा दिलासा दिला आहे.

जगभरातील आयटी क्षेत्रात महत्त्वाचे बदल होत असताना टाटा समूहाची दिग्गज आयटी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी जून तिमाहीत म्हणजेच तीन महिन्यांत कंपनीने ५,००० हून अधिक लोकांना नोकऱ्या देऊन कर्मचारी वाढवले होते तर, आता चालू आर्थिक वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ४०,००० फ्रेशर्ससाठी रोजगाराच्या संधी देणार आहे. म्हणजे कंपनी दररोज सुमारे ११० फ्रेशर्सना नोकऱ्या देईल. देशातील तरुणांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

यापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जून तिमाहीत ५,४५२ कर्मचारी जोडले असल्याची माहिती दिली. यासह कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६,०६,९९८8 झाली असून कंपनी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरपर्यंत फ्रेशर्सची भर घालत राहील. टीसीएसने म्हटले की या आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६.५ लाख होईल.

तरुणांना अधिक संधी देण्याचा प्रयत्नकंपनीचे मुख्य एचआर ऑफिसर मिलिंग लक्कड यांनी म्हटले की, भारतात कौशल्य भरलेले आहे, हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. या प्रतिभेला आम्हाला भविष्यात भूप फायदा होईल. कौशल्य विकास कार्यक्रम चालवून आणखी सुधारणा करता येईल. म्हणूनच आम्ही फ्रेशर्सना जास्तीत जास्त संधी देऊ इच्छित आहोत.

कृत्रिम बुद्धिमत्ताच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी तरुणांना तयार राहावे लागेल, असे त्यांनी म्हटले. तंत्रज्ञानातील बदलांमुळे नोकरीच्या बाजारातही बदल झाले आहेत ज्याला तोंड देण्यासाठी टीसीएस तयारी करत आहे. इंडस्ट्रीनुसार स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आमचे कर्मचारी नेहमीच तयार असतात.

हेही वाचा :

भुजबळांचे आत्मचिंतन आणि त्यांनी घेतलेली पवारांची भेट!

नकारात्मक विचारांनी डोकं होतं खराब? ‘या’ ६ उपायांनी नैराश्य जाईल दूर

मोठी बातमी! चॉकलेटनंतर तुळजाभवानी देवीला विलायची अन् लवंगाचा हार; भाविकांमध्ये संताप