शुभवार्ता! महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त

देशभरात सध्या गणेशोत्सवाची(festival) धूम आहे. गणेशोत्सवाच्या काळातच महालक्ष्मीचे आगमन होते.घरोघरी गौरींच्या स्वागताची तयारी झाली आहे. वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत, घरोघरी गौरीचे आज 10 सप्टेंबररोजी स्वागत केले जाईल. ज्येष्ठा गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकीच एक महत्त्वाचा सण आहे. आजच्या या शुभदिनी सोन्याने देखील शुभवार्ता दिली आहे.

आज सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत. त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. बाप्पाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरी तीन दिवस मुक्कामी असते. या काळात सोने-चांदीची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. आजच्या या शुभ दिवशी(festival) ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात 6 सप्टेंबर रोजी सोन्याने 550 रुपयांची आघाडी घेतली होती. त्यापूर्वी किंमतीत घसरणीचे सत्र होते. या आठवड्याची सुरुवात स्वस्ताईने झाली. तर दुसऱ्या दिवशी सोने 440 रुपयांनी उतरले. काल 9 सप्टेंबर रोजी किंमती स्थिर होत्या. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आता 22 कॅरेट सोने 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मात्र, चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यात चांदीने 2 हजारांची उसळी घेतली. तर, काल 9 सप्टेंबररोजी देखील चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. सध्या गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 71,378, 23 कॅरेट 71092, 22 कॅरेट सोने 65,382 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,534 रुपये, 14 कॅरेट सोने 41,756 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते

हेही वाचा:

धर्माचा व्यापक अर्थ सांगताना मोहन भागवत यांनी व्यक्त केले विचार

रश्मिका मंदानाचा अपघात, सोशल मीडियावर चाहत्यांना दिला प्रकृतीत सुधाराचा अपडेट

सांगलीत बेकायदा फलक आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू: महापालिकेचे कठोर पाऊल