गुड न्यूज! दसऱ्या आधीच सोनं झालं स्वस्त…

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मौल्यवान धातूमध्ये दरवाढ नोंदवली गेली. आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नववा दिवस आहे. तर, उद्या दसरा सण साजरा केला जाईल. आता, खरेदीदारांना दसऱ्याच्या पूर्वीच आनंदाची बातमी मिळाली आहे. आज 11 ऑक्टोबररोजी सकाळच्या सत्रात सोनं(gold) काही अंशी घसरले आहे. तर, चांदीमध्ये देखील घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मागील दोन दिवसात सोने(gold) 2300 रुपयांनी महाग झाले. 7 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी उतरले. मंगळवारी भाव जैसे थे होते. 9 ऑक्टोबर रोजी सोने 760 रुपयांनी तर त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात देखील सोन्यामध्ये घसरणीचे संकेत मिळत आहेत.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात चांदीने दिलासा दिला आहे. 8 आणि 9 ऑक्टोबररोजी चांदी 3 हजार रुपयांनी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,900 रुपये आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सध्या 24 कॅरेट सोने 74,838, 23 कॅरेट 74,538, 22 कॅरेट सोने 68,552 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 56,129 रुपये, 14 कॅरेट सोने 43,780 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.

हेही वाचा:

‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक

देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारचा ‘घर घर संविधान’ उपक्रम

मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार महामंडळ स्थापन करण्याची घोषणा; पत्रकार संघटनेचा पाठपुरावा यशस्वी