आनंदवार्ता! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

आज 16 नोव्हेंबररोजी आठवड्याच्या शेवटी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मौल्यवान धातू सोन्यात(Gold) घसरणीचे सत्र सध्या दिसून येत आहे. दिवाळीत भाव वरचढ होते. आता तुळशी विवाहा नंतर सोनं खाली उतरल्याचे चित्र आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसमारंभाला सुरुवात होते. या काळात सोने-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. सध्या सोन्याचे भाव कमी होत असल्याने सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे.

या आठवड्यात सोने(Gold) 1300 रुपयांनी स्वस्त झाले. आठवड्याच्या सुरुवातीला 11 नोव्हेंबर रोजी 600 रुपये, मंगळवारी 147 रुपयांनी तर 13 नोव्हेंबर रोजी 440 रुपयांनी सोने स्वस्त झाले. गुरुवारी सोने 120 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी सोने 110 रुपयांनी त्यात दरवाढ नोंदवली गेली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदीला आघाडी घेता आली नाही. या आठवड्यात चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली. आठवड्याच्या सुरुवातीला 11 नोव्हेंबर रोजी भाव 1 हजारांनी उतरला. मंगळवारी चांदी 2 हजारांनी तर 14 नोव्हेंबर रोजी चांदी 1500 रुपयांनी स्वस्त झाली. आज 16 नोव्हेंबररोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने आज 73,739 रुपये, 23 कॅरेट 73,444 रुपये, 22 कॅरेट सोने 67,545 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 55,304 रुपये, 14 कॅरेट सोने 43,137 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.

हेही वाचा :

झोमॅटो आणि जिओ फायनान्शिअलच्या स्टॉक्सची निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार? 

राज ठाकरेंना बालेकिल्ल्यातच धक्का, विश्वासू नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म