आनंदवार्ता! होळीत महागाईचे दहन, सोने-चांदीत स्वस्ताई, किंमती झाल्या कमी

या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा (relief)दिलासा दिला. या सणापूर्वीच पेटलेल्या या होळीत महागाईचे दहन झाले. काल आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातुच्या किंमतीत वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात सोने मध्यानंतर स्वस्त झाले होते. तर चांदीने मोठी झेप घेतली होती. मंगळवारी दोन्ही धातुत मोठी घसरण दिसून आली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…

गेल्या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. तर 10 मार्च रोजी सोने 110 रुपयांनी वधारले होते. मंगळवारी सोने 330 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात सुद्धा स्वस्ताईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,035 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मागील आठवड्यात चांदीने महागाईची तुतारी फुंकली होती. (relief) या आठवड्यातील सुरुवातीच्या दोन दिवसात चांदी किलोमागे 1100 रुपयांनी स्वस्त झाली. सकाळच्या सत्रात सुद्धा घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये इतका आहे.

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,024, 23 कॅरेट 85,680, 22 कॅरेट सोने 78,798 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,518 रुपये, 14 कॅरेट सोने 50,324 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,626 रुपये (relief)इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 89

हेही वाचा :

मंदिराच्या उंबरठ्याशी औरंगजेबाचा फोटो आणि गावकऱ्यांनी लिहिले औरंग्या, पुढे केले असे काही की…, Video Viral

घरगुती वादातून पाईपने मारहाण करुन मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून

एकनाथ शिंदेंना मोठा झटका! ‘त्या’ 3 महत्वाकांक्षी योजना बंद!