खुशखबर! आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी(news)घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांना हक्काचं घर मिळणार, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. ही योजना शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांसाठी असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, त्यांना आता हक्काचं घर मिळणार आहे.

संसदेत अर्थसंकल्प मांडताना(news) अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे. या योजनेचे उद्दिष्टं गरीबांना तसेच हक्काचं घर मिळायला हवं असा आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही ही योजना सुरू केली होती”.

“या योजनेअंतर्गत मार्च २०२४ पर्यंत ग्रामीण भागात २.९५ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.आतापर्यंत आम्ही कोट्यवधी लोकांना हक्काचं घर बांधून दिलंय. आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकचा निधी देऊन २०२५ पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात ३१.४ लाख घरे बांधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेनंतर संसदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं. प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार घराच्या किमतीच्या ६० रक्कम टक्के खर्च करते. उर्वरित खर्च राज्य सरकारे उचलतात.

हेही वाचा :

दारूच्या नशेमध्ये प्रियकर, प्रेयसी दंग; उचलून नेताना तोल गेला अन् पुढे…

अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; ‘पंचगंगेने’ इशारा पातळी ओलांडली

‘महिन्यातून 2 ते 3 वेळा तरी मी बॉयफ्रेंडसोबत…’, Janhvi Kapoor चा धक्कादायक खुलासा