सर्दी-खोकला झालाय? तुळशीचा चहा देईल आराम; जाणून घ्या सोपी रेसिपी

दिवाळीपासून हळू हळू थंडीने (cold)दार ठोठावायला सुरुवात केली आहे. याशिवाय पाऊस गेल्यामुळे आणि दिवाळीच्या फटक्यामुळे हवेचे प्रदूषण झाले आहे. या बदलत्या हवामानासोबतच खोकला, सर्दीही सुरू झाली आहे.

बदलत्या हवामानामुळे, विशेषत: हिवाळ्याच्या (cold)सुरुवातीला, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे लोक सर्दी-खोकल्याला बळी पडतात, त्यामुळे दैनंदिन काम करणे देखील कठीण होते. अशावेळी तुळशीचा चहा हा एक उत्तम घरगुती उपाय आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही खोकला, सर्दी आणि श्वसनाच्या इतर समस्यांपासून सहज आराम मिळवू शकता. चला तुळशीचा चहा कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य
10-12 ताजी किंवा 1 टीस्पून वाळलेली तुळशीची पाने
२ कप पाणी
½ इंच आल्याचा तुकडा (किसलेला)
3-4 संपूर्ण काळी मिरी (ठेचून)
चवीनुसार मध किंवा गूळ
लिंबाचा रस काही थेंब
हे ही वाचा: तुमचे तुळशीचे रोप सतत जळून जाते? ‘या’ टिप्स फॉलो करा, १२ महीने राहील हिरवे

कसा बनायचा चहा?
सर्व प्रथम एका भांड्यात २ कप पाणी घालून उकळून घ्या.
पाण्याला चांगली उकळी आली की उकळत्या पाण्यात तुळशीची पाने, किसलेले आले आणि ठेचलेली काळी मिरी घाला.
आता पाणी जवळपास निम्मे होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत 5-7 मिनिटे उकळू घ्या.
आता हा चहा गाळून कपमध्ये ओता. गोडपणासाठी, आपण चवीनुसार मध किंवा गूळ घालू शकता. यावरून लिंबाच्या रसाचे काही थेंब देखील घालू शकता.
अशाप्रकारे तुळशीचा चहा तयार आहे.
सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय असलेला हा चहा गरमागरम प्या.
चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही दिवसातून 2-3 वेळा तुळशीचा चहा पिऊ शकता.

हेही वाचा :

स्पेस स्टेशनमध्ये अडकलेल्या सुनीता विलियम्स अगदी ठणठणीत!

शाहूवाडीत सावकार विरुद्ध आबा मतदार संघावर कुणाचा ताबा!

BCCI च्या नव्या निर्णयामुळे ‘या’ स्टार खेळाडूला 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी