हायकोर्टात मिळाला न्याय; व्याकुळ आई बाळाला कुशीत घेऊन सुखावली

बाळाच्या ओढीने झोप (sleep)उडालेल्या आईला हायकोर्टाचे दार ठोठावल्यानंतर अखेर न्याय मिळाला. तिचे बाळ परत करण्याचे आदेश बाल कल्याण समितीने जारी केले. 29 मार्चला बाळाचा जन्म झाला. अवघ्या सात दिवसांत आईने बाळाला निवारागृहाकडे सोपवले. 29 मे रोजी बाळ आईला परत मिळाले. व्याकुळ झालेली आई बाळाला कुशीत घेऊन सुखावली.

दत्तक प्रक्रियेसाठी दिलेले बाळ परत मिळवण्यासाठी आईने अॅड. वर्षा भोगले यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्याची गंभीर दखल न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने घेतली. समितीला याबाबत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार समितीने बाळ परत करण्याचे आदेश जारी केले. त्याची माहिती बुधवारी समितीने न्यायालयात दिली. बाळ आईला दिले आहे. वर्षभर बाळाच्या संगोपनावर लक्ष ठेवले जाईल, असे समितीने खंडपीठाला सांगितले.(sleep)


बाळ रात्री जागे असते, दिवसा झोपते हे आईला ज्ञात होते. बाळ दुधासाठी रडत तर नसेल ना, त्याची काळजी घेतली जात असेल ना, या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. दूध बंद होण्यासाठी तिने औषध घेतले होते. दूध बंद होत नव्हते. बाळाच्या काळजीने तिचा जीव कासावीस झाला होता. अखेर तिने बाळाला परत घेण्याचे ठरवले. त्यासाठी तिने आशा सदन व समितीला विनवणी केली. दत्तक प्रक्रिया रद्द करण्यासाठी 29 एप्रिल 2024 रोजी रीतसर अर्ज केला. अर्जाचे उत्तर मिळत नसल्याने तिने न्यायालयात धाव घेतली.

हेही वाचा :

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ

सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…

सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं?